सोन-चांदीचे दर कमी होतील या आशेवर असणाऱ्यांची पुन्हा निराशा होणार आहे. कारण सोन्याचे दर कमी न होता चक्क तिप्पट वाढणार असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. सामान्यपणे हे समजले जाते की जर सोन्याच्या किंमती खूप वाढल्या तर त्या कमी होतात; पण सध्याची परिस्थिती बघता याउलट होणार असल्याण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती.
बाजारभावानुसार, सोन्याचा दर सध्या 1 लाख 25 हजार आहे. विश्लेषकांच्या मते, पुढील काळात सोने तिप्पटीने झळाळणार असून दर कमी होण्याचे शक्यता खूप कमी झाली आहे. Yardeni Research नुसार, पुढील तीन वर्षांत म्हणजेच 2028 पर्यंत सोन्याची किंमत 8 लाख 87 हजारांपर्यंत पोहोचू शकते. तर 2026 च्या अखेरीस, 4 लाखांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
जर ही भविष्यवाणी खरी ठरली, तर सध्या 4,000 डॉलर्स असलेली एक औंसची किंमत पुढील काही वर्षांत 150% वाढून 10,000 डॉलर्सपर्यंत जाऊ शकते, म्हणजेच एका औंससाठी सुमारे 8 लाख 87 हजार रूपये आणि एका तोळ्यासाठी सुमारे 3 लाख रूपये मोजावे लागू शकतात.
यार्देनी यांनी ‘बिझनेस इनसायडर’ एका कार्यक्रमात याबाबत सांगितले. केंद्रिय बँका त्यांच्या आंतरराष्ट्रीय सोन्याच्या साठ्यात वाढ करत आहेत, कारण विविध देशांमधील चलनाची अनिश्चितता आणि टॅक्स युद्ध, जसे की अमेरिकेच्या धोरणांमुळे चीनविरूद्ध लादले जाणारे कर, या सर्व गोष्टींमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊ शकते. या घटकांचे एकत्रित परिणाम म्हणून, यार्देनी रिसर्चचा असा अंदाज आहे की सोन्याच्या किंमती भविष्यात खूप वर जातील.
Yardeni रिसर्चचे अध्यक्ष ‘एडवर्ड यार्देनी’ यांनी त्यांच्या अहवालात असे मत मांडले आहे की, सोने केवळ एक value म्हणूनच नव्हे तर सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम म्हणून सुद्धा बघितले जाऊ शकते. त्यांच्या अंदाजानुसार, 2026 च्या अखेरीस सोन्याची किंमत 5,000 डॉलर्सपर्यंत जाऊ शकते आणि 2028 पर्यंत ती 10,000 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. जर यार्देनींची हा विचार खरा ठरला, तर ज्यांच्याकडे आता सोनं आहे त्यांना खूप फायदा होईल.
