Gaza : गाझामध्ये भूकेचा हाहाकार; अन्नाअभावी 115 जणांचा मृत्यू

News Trending

इस्रायल आणि इराणमधील युद्धला विराम देण्याबाबत साधारणपणे महिनाभर चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. परंतू इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुंळे गाझामधील परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे.

हमासचा खात्मा करण्याचा विडा उचलेल्या इस्रायलने गाझामधील अन्न पुरवठाही तोडला आहे. याचा परिणाम तेथील नागरिकांवर होत आहे. हमासच्या नियंत्रणाखालील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 81 बालकांसह एकूण 115 लोकांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. गाझामधील 21 लाख माणसे मूलभूत गरजांच्या तुटवड्याच्या भयंकर संकटाला तोंड देत आहेत. इथले कुपोषणाचे प्रमाण वाढत चालले आहे.

गाझामधील काही मोजक्याच उरलेल्या बाजारपेठांमध्ये खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. एका पीठाच्या पोत्याची किंमत 400 पाऊंडहून अधिक झाली आहे. त्यामुळे अन्नावाचून अनेक जीव जात आहेत. केवळ मानवी मदतीद्वारेच गाझामध्ये अन्न पुरविले जाऊ शकते. पण ती मदत मिळवणं अतिशय धोकादायक ठरत आहे. अन्न मिळविण्याच्या प्रयत्नात असलेले 1,054 पॅलेस्टिनी नागरीक इस्रायली लष्कराच्या कारवाईत मृत्यूमुखी पडले आहेत.

United Nations Relief And Works Agency च्या प्रमुखांनी सांगितले की, इजिप्त आणि जॉर्डनमध्ये सुमारे 6000 ट्रक अन्न पुरविण्यासाठी तयार ठेवले आहेत, मात्र गाझामध्ये प्रवेश मिळत नसल्याने नागरिकांपर्यंत मदत पोहचवण्यास उशिर होत आहे. येथील नागरिक मदत वितरित होत असलेल्या ठिकाणी पोहण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना गोळ्या घातल्या जातील या भीतीने जाणे टाळत आहेत. इस्रायलने निर्बंधमुक्त मदत पुरविण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

इस्रायली सिझमुळेच गाझामध्ये भुकेमुळे मृत्यू वाढत असल्याचा आरोप मदत संस्थांद्वारे केला जात आहे. येथे कार्यरत असलेले युनोचे कार्यकर्त्यांना देखील उपासमारी सामोरे जावे लागत आहे. त्यांनाही जेवण मिळत नसल्याने काम करत असताना भोवळ येत आहे. वैद्यकीय पथकांनाच अन्न मिळत नसल्याने तिथली संपूर्ण यंत्रणाच कोसळून पडली आहे.

Leave a Reply