Gauri poojan in maharashtra history : महाराष्ट्रभर गणपतीची धामधूम सुरु आहे. आताचे ३ दिवस तर गौरी आवाहन-पूजनाचे होते. अनेकांच्या घरी गौरी गणपती असतो. गौरीच्या रूपात साक्षात माता पार्वती माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरीपूजनाच्या दिवशी मटण, कोंबडीवडे असा बेत करायची पद्धत आहे. या नैवेद्यात चिंबोऱ्या म्हणजेच खेकडे व मासे सुद्धा आवर्जून समाविष्ट केले जातात. पण यामागे नेमकं कारण काय हे तुम्हाला माहीत आहे का?
कोकणात पहिल्या दिवशी गौराईला तांदळाच्या भाकरी आणि पालेभाजीचा नैवेद्य गौराईला दाखवतात. तसंच हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि पाच भाज्यांचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी दाखवण्यात येतो. तर काही ठिकाणी लाडक्या गौरीसाठी तिखटाचाही म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. ही परंपरा एका पौराणिक कथेवर आधारित आहे.
असं म्हणतात, गौरी म्हणजेच माता पार्वतीचे भगवान महादेवाशी लग्न झाल्यावर ती माहेरपणाला जात असते, तेव्हा शंकर भगवान तिच्यासह काही भूतगणांना रक्षणासाठी पाठवतात, माहेरवाशीण गौराईचे यावेळी माहेरी खूप लाड होतात पण भूतगणांना मांसाहार न मिळाल्याने त्यांची निराशा होते, अशावेळी गौराई आपल्या पाहुण्यांसाठी मांसाहार तयार करायला सांगते व सगळ्या भूतगणांचे जेवण उरकल्यावरच स्वतः अन्न ग्रहण करते.
यानुसार जेव्हा गणपतीच्या दिवसात ज्येष्ठागौरी घरी येतात तेव्हा भूतगणसुद्धा तिच्या रक्षणासाठी आलेले असतात, असे मानले जाते. या भूतगणांच्या आनंदासाठी मांसाहाराचा बेत केला जातो.यानुसार जरी नैवेद्य गौरीसमोर ठेवण्यात येत असला, तरी तो देवी पार्वतीला नसून सोबत आलेल्या भूतगणांसाठी असतो. मांसाहाराचा नैवैद्य दाखवताना गौराई व नैवेद्यामध्ये तसेच गणपती बाप्पा व गौराईच्या मधोमध सुद्धा पडदा लावला जातो.
गौरी लाच महाराष्ट्रात काही भागात महालक्ष्मी असंही म्हटलं जातं. तिला मद्य आणि मांसाहाराचा नैवैद्य दाखवतात. तर काही ठिकाणी विविध भाज्यांचे नैवैद्य दाखवले जातात. गौरीचं आगमन हे सुखसमृद्धीचं समजलं जातं. त्यामुळे गणेशोत्सवात गौरीपूजनाला विशेष महत्त्व आहे.
याशिवाय, पुराणात ज्येष्ठा लक्ष्मी व कनिष्ठा लक्ष्मी असा संदर्भ सापडतो. या पौराणिक संदर्भानुसार अलक्ष्मीचा वावर हा अनिष्ट, अशुभ ठिकाणी असतो, तर याउलट लक्ष्मी ही शुभ ठिकाणी विराजमान होते. मूलत: इष्ट व अनिष्ट ही एकाच लक्ष्मीची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अन्य शुभ मुहूर्तांवर कनिष्ठा म्हणजेच महालक्ष्मीची पूजा केली जाते पण आपल्याच बहिणीला नारायण भार्या लक्ष्मीने दिलेल्या वचनानुसार वर्षातील काही विशेष मुहूर्तांवर तिची पूजा केली जाते. म्हणूनच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्येष्ठेला दाखविण्यात येणारा मांसाहारी नैवेद्य हा निषिद्ध नाही.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…