गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. दीड दिवसाच्या गणपतीपासून ते दहा दिवसांच्या गणपती पर्यंत हा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. आपण हिरो-सिनेमामध्ये पाहून विविध पोझमधले बाप्पा आपण सिलेक्ट करतो. पण, अशा मूर्ती गणेशस्वरूप नसतात. त्यामुळे घरी गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी आणताना काही नियम लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
गणपतीच्या सोंडेची दिशा महत्त्वाची
वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घेताना त्यांच्या सोंडेकडे विशेष लक्ष द्यावे. घरात वामवर्ती सोंड असलेली मूर्ती आणणे चांगले मानले जाते. म्हणजे ज्या मूर्तीमध्ये गणपतीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे अशी मूर्ती घ्यावी. ही दिशा यश आणि समृद्धीची मानली जाते. उजव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती (दक्षिणामुखी गणेश) पूजायला कडक असते असे म्हणतात. त्यांना प्रसन्न करणेही खूप अवघड असते. त्यामुळे अशा प्रकारच्या मूर्ती सहसा देवळात ठेवल्या जातात. सोंड दुमडलेली मूर्ती आणू नये. सरळ सोंडेचीही मूर्ती शुभप्रद नसते. त्यामुळे मोदकाकडे सोंड नेलेली मूर्ती आणावी.
गणपतीच्या मुद्रेकडे लक्ष द्या
गणेश चतुर्थीसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती मिळतात. काही मूर्तींमध्ये गणपती उभे असतात, काही नाचताना दिसतात, तर काही आराम करत असतात. पण घरात बसलेल्या मुद्रेतील गणपतीची मूर्ती आणणे सर्वात शुभ मानले जाते. सिंहासनावर किंवा कोणत्याही आसनावर बसलेली प्रसन्न मूर्ती आणावी. बाळकृष्ण, श्रीराम, नरसिंह, विष्णू अशा कोणत्याही रूपात गणपती आणू नये. कारण त्या देवतांची स्वरूपे वेगळी आहेत. गणपतीला स्वरूप आहे. त्यामुळे आसनस्थ, चार हात, डाव्या सोंडेची प्रसन्न मूर्ती आणावी. असे केल्याने घरात चांगले फळ मिळते. कुटुंबातील सदस्यांना सुख-समृद्धी लाभते. तसेच घरात भरभराट येते.
गणपतीच्या मूर्तीमध्ये मोदक आणि उंदीर आवश्यक
गणपतीला मोदक खूप आवडतात आणि मूषक हे त्यांचे वाहन आहे. त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती घेताना मूर्तीमध्ये मोदक आणि मूषक आहेत की नाही हे नक्की पाहा. अशा प्रकारची मूर्ती घरात असणे खूप शुभ मानले जाते.
मूर्तीच्या रंगावर लक्ष द्या
गणपतीची मूर्ती घेताना रंगावरही लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार पांढऱ्या रंगाची मूर्ती घरात आणणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-शांती आणि समृद्धी टिकून राहते. यासोबतच तुम्ही सिंदुरी रंगाची मूर्तीसुद्धा आणू शकता. त्यामुळे आत्म-विकास होतो. घरात सुख-शांती आणि समृद्धी टिकून राहते असे मानले जाते. काळा, राखाडी, लाल, निळी, हिरवी अशा विचित्र रंगांच्या मूर्ती आणू नये.
गणपतीची मूर्ती कधी आणावी?
गणपतीची मूर्ती चतुर्थीच्या आधी शुभ मुहूर्तावर घरी आणावी. असे केल्याने शुभ फळ मिळते. रात्री, मध्याह्नी, सूर्यास्ता नंतर मूर्ती आणू नये.
मग, गणपती बाप्पा आणताना आधी हे नियम वाचून घ्या आणि मग शुभ मुहूर्तावर योग्य बाप्पा घरी आणा!
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…