गणपती म्हणजे विघ्नहर्ता, मंगलकर्ता आणि सर्वांचा लाडका बाप्पा. बाप्पाबद्दल लहानपणापासूनच आपण अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत. त्याच्या जन्माची कथा तर अगदी लहानग्यांपासून वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांना माहित आहेत. याचबरोबर गणपतीला गजमुख कसे मिळाले, बंधू कार्तिकेयसोबत लावलेली शर्यत व बाप्पाची अनोखी पृथ्वी प्रदक्षिणा, चंद्र आणि उंदीरावरून पडलेल्याची गोष्ट, मोदकांची आवड या अशा अनेक गोष्टी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र आपल्या या लाडक्या बाप्पाच्या संततीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या लेखाद्वारे आपण बाप्पाच्या संततीबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत.
महादेव आणि पार्वती यांचे दुसरे सुपुत्र श्री गणेश यांना दोन पुत्र आणि एक कन्या अशी तीन अपत्ये आहेत. याचा उल्लेख पुराणकथा आणि लोकपंरपरेत आढतो. गणेशाला दोन पुत्र म्हणजे क्षेम आणि लाभ आणि तिसरी कन्या म्हणजे संतोषी माता.
क्षेम(शुभ)
क्षेम म्हणजे सुरक्षितता, कल्याण, शांती आणि आयुष्याचे रक्षण प्रत्येकाच्या आयुष्यात सुखरूपता आणि आरोग्य अबाधित राहावे, हे क्षेमाचे प्रतीक आहे. क्षेम यालाचं शुभ असे देखील म्हटले जाते.
लाभ
लाभ म्हणजे संपत्ती, यश आणि प्रगती व्यापारी आणि व्यावसायिक गणपतीची पूजा करतात ती लाभासाठीच. कोणत्याही शुभ प्रसंगी गणेश पूजनाआधी शुभ लाभ असे लिहिले जाते.
क्षेम आणि लाभ हे गणपतीचे प्रतीकात्मक अर्थ आहेत. गणपती जेथे पूजला जातो, तेथे क्षेम आणि लाभ आपोआप मिळतात. काही शिल्पांमध्ये गणेशाच्या दोन बाजूला उभे असलेले हे पुत्र पाहायला मिळतात.
संतोषी माता
गणेशाचे तिसरे अपत्य म्हणून संतोषी मातेला मानले जाते. ही संतोष, समाधान आणि मन:शांती यांचे प्रतीक आहे. जीवनात क्षेम(सुरक्षितता) आणि लाभ(समृद्धी) असली तरी अंत:करात समाधान नसेल तर आयुष्य अपूर्ण आहे. म्हणून संतोषी मातेची आराधना करून समाधान मागितले जाते. 20 व्या शतकात घरोघरी शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत रूढ झाले. अशा प्रकारे गणपतीची ही तीन अपत्ये जीवनातील समृद्धी, सुरक्षा आणि संतोषाची परिपूर्ण त्रिसूत्री ठरतात.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…