गणेशोत्सव आला की भजन आणि आरत्या यांचे सूर कानात गुंजू लागतात. अगदी रिल्स पासून मिम्समध्येही आरत्या-भजन यांचेच रेफरन्स दिसतात. गणपतीची मूर्ती, आरास, मोदक हा जसा चर्चेचा आणि ते सगळं आनंदाने पार पाडण्याचा विषय हे तसा एकत्र येऊन आरत्या म्हणणं हा सुद्धा एक सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक लोकांना लहानपणापासून या आरत्या म्हटल्याचं आणि त्यावेळी ‘फळीवर वंदना की वाट पाहे सजणा’ म्हटल्याचंही आठवत असेल. उंदीरमामा की जय हा बदल आपण जसा स्वीकारला तसं मूळ आरत्यांबदद्ल माहिती असणे आवश्यक आहे.
आरती कशी म्हणावी ?
गोविंदशास्त्री केळकर यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख मराठी विश्वकोशात आहे. ही नोंद सांगते, ताम्हणात निरांजन वा कापूर लावून त्याने देवादिकांना ओवाळणे म्हणजे आरती. याला संस्कृतात आरात्रिक, आर्तिक्य, आरार्तिक्य अथवा महानीरांजना असे म्हणतात. या वेळी वाद्ये वाजवावयाची असतात. देवादिकांच्या स्तुतिपर विशिष्ट प्रकारचे जे गीत या वेळी म्हणतात, त्यालाही आरती असे म्हणतात.
पूजेतील ‘दीप’ या उपचाराहून ‘आरती’ हा उपचार भिन्न आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करावयाची असते. आरतीचे पात्र देवाच्या पायापुढे चार वेळा, नाभीपुढे दोन वेळा, मुखापुढे एक वेळा व सर्व शरीरापुढे सात वेळा ओवाळावयाचे असते. निरांजनात वाती अनेक असाव्यात. कर्मांची अविकलता व पापनाश हे आरतीचे फल होय.”
आरती म्हणजे काय?
याचाच अर्थ आरती म्हणजे फक्त ईशस्तुतीसाठी म्हटलं जाणारं गीत म्हणजे आरती नव्हे. त्याआधी पूजा, ओवाळणे, नैवेद्य या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होतो. सध्या महाराष्ट्रात आणि जगभरात पसरलेल्या मराठी कुटुंबांमध्ये ज्या आरत्या म्हटल्या जातात, त्यातील बहुतेक आरत्यांचं लेखन समर्थ रामदासांनी केलं आहे. सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती म्हणायला सोपी आहेच त्याहून सर्वांच्या आवडीची आहे.
गणपतीची आरती- बहुतेक ठिकाणी सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती सुरुवातीला म्हटली जाते. काही ठिकाणी ‘शेंदूर लाल चढायो’ ही आरती म्हटली जाते. सुखकर्ता दुःखहर्ता या आरतीत रामदासांनी आपलं नावही लिहून ठेवलेलं आहे. ‘दास रामाचा वाट पाहे सदना..’ अशी ओळ त्यांनी योजलेली आहे. बहुतेक घरांमध्ये गणपतीबरोबर देवीची, शंकराची आरतीही म्हटली जाते.
देवीच्या आरतीमध्य़े भक्त देवीकडे मदतीच्या अपेक्षेने पाहात असून तिला आपल्या चांगल्या वागण्याचे आश्वासनही देतात असं पत्रकार आणि कीर्तनकार ज्योत्स्ना गाडगीळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.
त्या म्हणाल्या, “कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देवीकडे आहे. तिच्याकडे आम्ही व्याकुळतेने पाहात आहोत. माझ्या आसपास असलेल्या तुझ्या सर्व स्त्री अंशाचा मी आदर करेन असंही यात भक्त देवीला सांगतात.
त्यामुळे एकूणच समूहातील सर्व लोकांचं एकत्रीकरण करण्यासाठी, सर्वांचा सहभाग नोंदवण्यासाठी सामूहिक आरतीची संकल्पना उदयाला आली.
शंकरदेवाच्या आरतीबद्दल गाडगीळ सांगतात, ‘लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा, विषेकंठकाळ त्रिनेत्री माळा’ अशा शब्दांमधून समर्थ रामदासांनी शंकरदेवांचं वर्णन केलं आहे. रामदासांनी सर्वच आरत्यांमधून शब्दांमध्ये प्राण फुंकलेले दिसतात. मराठी भाषेवरचं त्यांचं प्रेम या शब्दयोजनेतून दिसून येतं. सर्व आरत्यांमधील अशा प्रकारच्या वर्णनामुळे देव साक्षात डोळ्यांसमोर उभे राहातात.
आधुनिक काळात पूजेचा अधिकार सर्व वर्गांना नव्हता. त्यामुळे वैदिक पूजेत सगळ्यांना सहभागी करून सामूहिक आरतीची संकल्पना समोर आली. त्याचे राजकीय परिणामही आपण पाहिलेच आहेत.”
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…