Random News

हवाई हल्ल्यात “अल जझीरा”चे पाच पत्रकार ठार; मृत्यूमुखी पडलेल्यापैकी एक दहशतवादी असल्याचा इस्रायलचा दावा

 

गाझा शहरातील अल-शिफा रूग्णालयाबाहेर पत्रकारांसाठी लावलेला तंबू इस्रायलच्या हवाई हल्ल्याचे लक्ष्य ठरला. या हल्ल्यात पाच पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा हल्ला रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाला, जेथे अनेक माध्यम प्रतिनिधी वास्तव्यास होते. ही घटना रविवारी रात्री उशीरा घडली. 

अल जझिराने जाहीर केलेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये दोन अल जझिका वार्ताहर अन्स अल शरिफ आणि मोहम्मज क्रेइकेह यांचा समावेश आहे. तसेच कॅमेरामन इब्राहिम झाहर आणि मोहम्मद नौफल यांचाही मृत्यू झाला. पाचवा मृत पत्रकार स्थानिक फ्रीलान्स व्हिडीओग्राफर असल्याचे सांगण्यात येत आहे.   

इस्रायली लष्कराने अन्स अल शरिफ या पत्रकाराबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, पत्रकार असल्याचे भासवून प्रत्यक्षात हमासचा ऑपरेटिव्ह म्हणून काम करत होता, त्याच बरोबर अनस अल शरीफ हा हमास या दहशतवादी संघटनेच्या सेलचा प्रमुख होता. त्याच्यावर इस्रायली लष्कर आणि सामान्य नागरिकांवर  रॉकेट हल्ले आखणी करण्याचे काम करत असल्याचा आरोप लष्कराने केला आहे. लष्कराने दिलेल्या एका निवेदनात, गाझामधून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये आणि यादीमध्ये अल शरिफचा हमाससोबत थेट  संबंध असल्याचे दिसते. पत्रकाराचे ओळखपत्र दहशतवादासाठी ढाल ठरू शकत नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

मृत्यूपूर्वी अल शरीफ याने एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये गाझा सिटीच्या पूर्व आणि दक्षिण भागात वाढलेल्या बॉम्बहल्ल्यांबाबत माहिती दिली होती. व्हिडीओमध्ये बॉब्मस्फोटाचे आवाजही ऐकायला मिळत आहेत. व्हिडीओवर दिलेल्या कॅप्शनमध्ये गेल्या दोन तासांपासून सतत  बॉम्बहल्ले सुरू आहेत, गाझा शहरावरील इस्रायलचे हल्ले तीव्र झाले असल्याचे देखील त्याने म्हटले होते.  

अल जझिरा आणि पत्रकार संरक्षण समिती यांनी हे आरोप फेटाळले असून, पुरावा न देता केलेले आरोप पत्रकारांवरील विश्वास आणि सुरक्षेवरील आघात असल्याचे म्हटले आहे. पत्रकार संरक्षण समितीने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर 2023 पासून   आत्तापर्यंत गाझामध्ये किमान 186 पत्रकार ठार झाले आहेत, तर 90 हून अधिक पत्रकारांना इस्रायलने तुरुंगात कैदेत ठेवले आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

18 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

18 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago