Lifestyle

फास्टॅगचा मास्टर स्ट्रोक – फक्त १५रु टोल भरुन देशभर फिरा!

तुम्ही जर का नॅशनल हायवे ने प्रवास करीत असाल आणि तुम्हाला देशभर प्रवास करण्याची आवड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलचे दर कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने नुकतीच ‘फास्टॅग वार्षिक पास योजना’ जाहीर केली आहे. दर काही किलोमीटरवर टोल देताना थांबावं लागतं, आणि प्रत्येक वेळी वॉलेटमधून ५०-१०० रुपयांची रक्कम कमी होताना पाहणं हे आता भूतकाळात जमा होणार आहे! चला तर मग या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया फास्टॅगचा मास्टर स्ट्रोक काय आहे तो!

फास्टॅग वार्षिक पास म्हणजे काय?
नवीन फास्टॅग वार्षिक पास ही योजना खासगी, बिगर व्यावसायिक वाहनधारकांसाठी आहे. या योजनेअंतर्गत वाहनचालक एका वर्षासाठी फक्त ३०००रु भरून देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर (National Highways) २०० टोल नाके सहजपणे पार करू शकतात. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रत्येक टोल फेरीसाठी केवळ १५ रु इतकाच टोल आकारला जाईल. सध्याच्या टोल दरांशी तुलना करता हे नागरिकांच्या आर्थिक बचतीचं महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या योजनेचे वैशिष्ट्ये
• वार्षिक शुल्क फक्त ३०००रु
• २०० टोल फेऱ्यांसाठी वैध
• फक्त खासगी, नॉन-कमर्शियल वाहनांसाठी
• देशभरातील NHAIच्या राष्ट्रीय महामार्गांवर लागू
• १५ ऑगस्टपासून योजना सुरु होणार
• फास्टॅगशी संलग्न RFID तंत्रज्ञानावर आधारित
• राज्य महामार्गांवर (State Highways) लागू नाही

फास्टॅग वार्षिक पास मिळवायचा कसा?
या पाससाठी 15 ऑगस्टपासून अर्ज करता येईल. ‘राजमार्ग यात्रा’ अ‍ॅप, NHAI किंवा परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून तो उपलब्ध असेल. एकदा पास घेतल्यानंतर तो पुढे रिन्यू (नूतनीकरण) देखील करता येऊ शकतो.

२०० फेऱ्यांचा अर्थ काय?
इथे ‘एक फेरी’ म्हणजे एका टोल नाक्यावरून एक वेळचा प्रवास. म्हणजेच, वर्षभरात २०० वेळा कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका पार करण्याची परवानगी मिळते. उदाहरणार्थ, जर एखाद्या टोलवर सरासरी ५०रु टोल आकारला जात असेल, तर २०० ट्रिपसाठी १०,०००रु टोल भरावा लागला असता. पण या पासमुळे तो खर्च केवळ ३,०००रु इतकाच होईल.

ही योजना नेमकी कुठे लागू होईल?
फास्टॅग वार्षिक पास फक्त राष्ट्रीय महामार्गांवरच (NHs) लागू आहे. म्हणजेच, NH 3, NH 4, NH 6 अशा क्रमांक असलेल्या मार्गांवर याचा फायदा मिळेल. मात्र, राज्य महामार्गांवर (जसे की समृद्धी महामार्ग), ही योजना लागू होणार नाही.

या योजनेमागील उद्देश
• टोल नाक्यांवरील वाहतूक नियंत्रण
• रोख रकमेच्या देवाणघेवाणीतून होणारा वेळ वाचवणे
• डिजिटल पेमेंटला चालना
• प्रवास अधिक किफायतशीर आणि जलद करणे
• फास्टॅगशी संबंधित वाद कमी करणे

फास्टॅग वार्षिक पासचा कसा होतो वापर?
हा पास सध्याच्या फास्टॅग RFID प्रणालीसह संलग्न केला जाईल. एकदा पास सक्रिय झाला की, वाहन टोल नाक्यावर पोहोचल्यावर टोलची रक्कम आपल्या फास्टॅग अकाउंटमधून स्वयंचलितपणे वजा केली जाईल. 2022 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले होते की, दोन टोल नाक्यांमधील अंतर किमान 60 किलोमीटर असावं. हा नियम वाहनधारकांसाठी टोल माफ करण्यासाठी नाही, तर बेकायदेशीर टोल नाके थांबवण्यासाठी आहे.

भविष्यातील टोल प्रणालीत काय बदल?
सरकार आता बॅरियर-लेस टोलिंग सिस्टिम विकसित करत आहे. यात ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) वापरलं जाईल, ज्यामुळं टोल नाके उभे राहण्याची गरजच उरणार नाही. या प्रणालीची चाचणी निवडक हायवेजवर सुरू आहे. फास्टॅग वार्षिक पास योजना ही खासगी वाहनधारकांसाठी खरोखरच बचतीची आणि सोयीची योजना आहे. टोलवरील अनावश्यक खर्च आणि रांगा टाळण्यासोबतच, प्रवासात वेळ व पैसा दोन्हींची बचत होणार आहे. 15 ऑगस्टपासून ही योजना सुरु होत असल्याने, वेळेत नोंदणी करून आपला फास्टॅग वार्षिक पास मिळवा आणि देशभरात अधिक माफक दरात, झपाट्याने प्रवासाचा आनंद घ्या!

Team Jabari Khabari

Recent Posts

“मूलांना जन्म द्या सबसिडी मिळवा” चीनचे नवे धोरण

चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…

20 hours ago

Malegaon Blast: 17 वर्षांनंतर अखेर भगवाचं जिकंला! स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…

2 days ago

ट्रम्प यांनी भारतावर लादले कठोर टॅरिफ! रशियासोबत व्यवहाराचा फटका?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…

2 days ago

Mahadevi Elephant : महादेवीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर; गावकऱ्यांचा हत्तीणीला निरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…

3 days ago

जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर? नेमकं काय घडलं… वाचा सविस्तर

दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…

4 days ago

UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी – 1 ऑगस्टपासून व्यवहारामध्ये नवे बदल

वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…

4 days ago