उद्धवजी, तुम्हाला सत्तेत आणतो’ – फडणवीसांची सभागृहात धक्कादायक ऑफर!

News Political News

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ यांचा कार्यकाळ २९ ऑगस्टला संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज विधान परिषद सभागृहात त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदी नेत्यांची भाषणे झाली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवेंबाबत आपल्या खास शैलीत भाषण करत शिवसेनेला चिमटे काढले. तसेच त्यांनी थेट सभागृहातच उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेजी आमचं सरकार २०२९ पर्यंत पक्कं आहे; तुम्ही यायला तयार असाल तर चर्चा करू शकतो. परंतु त्यावर आपण वेगळ्या पद्धतीने बोलू असे ते म्हटले. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply