Crime stoey jabari khabari
राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. मांडलगढ परिसरातील सीताकुंड जंगलात दगडांच्या ढिगाऱ्याखाली एक अवघं १५ दिवसांचं नवजात बाळ आढळून आलं. विशेष म्हणजे, बाळाच्या तोंडात दगडं कोंबून वरून फेविक्विक लावण्यात आलं होतं. तरीही बाळ चमत्कारीकरीत्या जिवंत असून सध्या उपचार सुरू आहेत.
Crime Story : पत्नीने चिकन करायला दिला नकार! म्हणून पतीने उचलले टोकाचे पाऊल
Navaratri 2025:मुंबादेवीवरून मुंबई! पण मुंबा हे नाव देवीला कसे मिळाले?
Navaratri 2025 : पाकिस्तानातील मुस्लिम करत असलेली नानी का हज आहे आपल्या हिंदूंचे शक्तिपीठ !
मंगळवारी दुपारी जनावरे चरण्यासाठी जंगलात गेलेल्या एका गुराख्याला दगडांच्या ढिगाऱ्यातून मंद स्वरात रडण्याचा आवाज आला. संशय आल्यानंतर तो जवळ गेला असता दगडाखाली बाळ दिसले. त्याने तत्काळ दगड हटवून बाळाला बाहेर काढले. याबाबतची माहिती त्याने जवळच्या मंदिरात बसलेल्या ग्रामस्थांना दिली आणि नंतर पोलिसांनाही कळवण्यात आले.
घटनास्थळी पोलिस पोहोचले असता तिथे फेविक्विकचे रिकामे पाऊच देखील आढळून आले. प्राथमिक चौकशीतून असे स्पष्ट झाले की, बाळाचा रडण्याचा आवाज थांबवण्यासाठी त्याच्या तोंडात दगडं भरून फेविक्विकने तोंड बंद करण्यात आलं होतं.
ताबडतोब १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने बाळाला बिजौलिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला भीलवाडा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाची प्रकृती सुधारत आहे. मात्र दगडांच्या उष्णतेमुळे त्याच्या शरीराचा डावा भाग भाजला आहे.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध सुरू आहे.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…