Random News

बाबा मिस यू… विजू मानेंची लेक प्रिया मराठेसाठी भावनिक पोस्ट

Priya Marathe : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेच ३१ ऑगस्ट रोजी कॅन्सरमुळे निधन झालं. मराठी-हिंदी मालिकांमुळे ती अनेकांच्या घरा-घरात पोहचली होती. ऐन तारुण्यात तिचं निधन झाल्यामुळे मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रियाच्या निधनाची बातमी समोर येताच सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. तिला आपली लेक मानणाऱ्या मराठी दिग्दर्शक विजू माने यांनीदेखील भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

विजू मानेंची पोस्ट
A fairytale ends…
“मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का?” हा तिने विचारलेला प्रश्न अजूनही कानात आहे. सssssssर अशी मोठ्याने हाक मारून अक्षरशः लहान मुलीसारखी बिलगायची. माझ्या बायकोहून जास्त वयाच्या ह्या पोरीला मी मनापासून ‘लेक’ मानलं होतं. बांदोडकर कॉलेजात एक मॉब प्ले केला होता. अ फेअरी टेल…प्रियाचं रंगभूमीवरलं पहिलं काम. तिला अगदी बोटाला धरून एकांकिकेत आणलं. राजकन्या होती त्यात ती. तेच बोट धरून माझ्या आयुष्यात वावरली.
माझ्या मुलीला मी सांगायचो, तुझ्याआधी मला एक मुलगी आहे बरं का… तिच्या आयुष्यातले खूप चढ-उतार पाहिले. शंतनूसारखा गोड मुलगा तिला मिळाला. खूप बरं वाटलं होतं. गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया. बाबा मिस यू…बाबा लव्ह यू…

दरम्यान, प्रिया मराठे गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. उपचारादरम्यान तिची प्रकृती सुधारली होती, परंतु,अखेर आजारावर मात करता आली नाही. तिचं 31 ऑगस्ट 2025 रोजी, मीरा रोड (मुंबई) येथील राहत्या घरी निधन झाले.

प्रिया मराठे ही मराठी मालिकांमुळे घराघरांमध्ये पोहचली होती. ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ यांसारख्या मालिकांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, हिंदीमधील सुपरहिट मालिका ‘पवित्र रिश्ता’ मधील ‘वर्षा’ या भूमिकेमुळे तिला घराघरात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘साथ निभाना साथिया’, तसेच ‘कॉमेडी सर्कस’ सारख्या शोजमध्ये तिने अनेक भूमिका केल्या. प्रियाच्या जाण्याने मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

15 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

15 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

1 day ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago