राहुल गांधींचा “वोटचोरी आरोप” निवडणूक आयोगाने फेटाळला

News Political News

काँग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रिय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. 2023 मध्ये कर्नाटक येथे झालेल्या निवडणुकीत मत चोरी झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जवळपास पाऊण तास पत्रकार परिषदेत घेत काही पुरावेदे खील सादर केले आहेत. मात्र राहुल गांधीचा हा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. आयोगाने हा आरोप चुकीचा आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

या पत्रकार परिषदेत पुरावे सादर करताना राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर मत चोरी करणाऱ्यांचा आणि लोकशाही नष्ट करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे म्हटले. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतदार यादीतील नावे कशी वगळली जात आहेत याचा खुलासा केला.

निवडणूक आयोगाने मात्र “X” च्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट करत, राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे चुकीचे आणि निराधार असल्याचे म्हणत धुडकावून लावले आहेत. तसेच, जसा राहुल गांधी यांनी गैरसमज व्यक्त केला तसे, कोणत्याही नागरिकास ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव वगळणे शक्य नाही. 2003 मध्ये आलंद विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वत: निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवला होता. नोंदीप्रमाणे, आलंद विधानसभा मतदारसंघ 2018 मध्ये भाजपचे सुभाष गुट्टेदार यांनी जिंकला होता, तर 2023 मध्ये काँग्रेसचे बी.आर पाटील यांनी जिंकला.

Leave a Reply