मुंबई – महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युतीची घोषणा केली.हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. दरम्यान आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती करुन एकनाथ शिंदेंनी मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी खेळल्याची राजकीय चर्चा आहे.
त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल..
“आगामी निवडणुकांसाठी आनंदराज आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेसोबत हातमिळवणी करण्याचा आम्हाला अभिमान आहे.” ही भागीदारी सामायिक मूल्यांवर आणि सामाजिक न्यायाच्या वचनबद्धतेवर बांधली गेली आहे. “समावेशक विकास आणि उपेक्षितांसाठी एक मजबूत आवाज सुनिश्चित करण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करू,” तसेच शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. या सेना रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल असे शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईतील दलित आणि मराठी मतांचे समीकरण साधण्यासाठी ही युती झाल्याचे म्हटले जात आहे.
कुठल्याही अटीशिवाय आम्ही ही युती..
शिंदे हे वेगळे नेते असून ते सर्वांना सोबत घेऊन जातात. कुठल्याही अटीशिवाय आम्ही ही युती करत आहोत. कुठलीही अडी न ठेवता त्यांनी देखील पुढे जायचं ठरवलं.आंबेडकरी कार्यकर्त्याना सत्तेत सहभागी करून घेण्याचा शब्द शिंदे यांनी दिला आहे, त्यामुळेच ही युती होत आहे. अशी माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…