दिवाळी जवळ आली की समस्त कर्मचारी वर्गाला वेध लागतात ते दिवाळी बोनसचे. मग कॉर्पोरेट असो, किंवा खासगी-सरकारी कर्मचारी सगळे जण बोनस कधी मिळणार, किती मिळणार असे प्रश्न विचारायला सुरु करतात. तुझ्या कंपनीत किती-माझ्या कंपनीत किती याच्याही गप्पा रंगतात. पण आपल्याला दिवाळी बोनस का मिळतो, माहीत आहे का? जाणून घेऊया…
भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान सर्वज्ञात आहे. पण त्यांचे कार्य फक्त दलितोद्धारापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी समाजातील प्रत्येक शोषित, पीडित आणि कामगार वर्गासाठी लढा दिला. कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेले कार्य आजही आपल्या दैनंदिन जीवनात प्रतिबिंबित होते. याचाच एक जीवंत पुरावा म्हणजे ‘दिवाळी बोनस’ जो त्यांच्या विचारातून आणि प्रयत्नांतून जन्माला आला.
On this day in History: इतिहास साक्षी आहे ! ३२५ वर्षांपूर्वी ‘या’ नदीने औरंगजेबालाही केला लंगडा
डॉक्टरांचे Handwriting ठरले 7 हजार मृत्यूंचे कारण! सुवाच्च अक्षरात Prescription लिहिणे आता बंधनकारक
Navaratri2025:अभ्यासासाठी सरस्वती, धनप्राप्तीसाठी लक्ष्मीदेवी आणि उत्तम स्वयंपाकासाठी अन्नपूर्णा देवीच का ?
कामगारांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांचा लढा
ब्रिटिशांच्या आधी भारतात कामगारांना आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती. या प्रणालीत वर्षभरात ५२ आठवड्यांचा पगार, म्हणजेच १३ महिन्यांचा पगार मिळत असे. पण इंग्रजांनी इंग्रजी महिन्यानुसार पगार देण्याची नवी पद्धत सुरू केली, ज्यात वर्षात फक्त १२ पगारच दिले जात. ही विसंगती डॉ. आंबेडकरांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच सरकारकडे याबाबत पत्र लिहून प्रश्न उपस्थित केला, “जेव्हा कामगार वर्षभर काम करतात, तेव्हा त्यांना १३वा पगार मिळायलाच हवा.” सरकारने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले, पण बाबासाहेबांनी इशारा दिला की, हक्क न दिल्यास ते आंदोलन करतील. अखेर सरकारला या विषयाचे गांभीर्य लक्षात आले.
दिवाळी बोनसचा जन्म
या विषयावर विचारविनिमय सुरू झाला आणि डॉ. आंबेडकरांनी भारतीय संस्कृतीशी सुसंगत अशी उपाययोजना सुचवली. त्यांनी सुचवले, “वर्षातील सर्वात मोठ्या सणाच्या, म्हणजे दिवाळीच्या आधी, कामगारांना एक अतिरिक्त पगार द्यावा.” त्यांच्या सूचनेनुसार, ३० जून १९४० रोजी ‘बोनस देण्याचा कायदा’ लागू करण्यात आला. ही केवळ आर्थिक मदत नव्हती, तर कामगारांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या श्रमांच्या किमतीचा सन्मान करणारी क्रांतिकारी पायरी होती.
कामगारहितासाठी एक व्यापक दृष्टिकोन
बाबासाहेबांनी समाजातील प्रत्येक शोषित वर्गासाठी समान संधी आणि न्यायाची मागणी केली. त्यांचा विचार स्पष्ट होता, “श्रमाचा सन्मान करा आणि श्रमिकांचा हक्क द्या.” त्यांनी फक्त कायदे केले नाहीत, तर समाजाच्या आर्थिक रचनेतही परिवर्तन घडवले.
आज आपण दरवर्षी मिळवतो तो ‘दिवाळी बोनस’, ही केवळ आर्थिक मदत नाही, तर डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा आणि कामगारहितासाठीच्या संघर्षाचा परिणाम आहे.
