digital-reconstruction-of-2500-year-old-ancient-indian-faces-keeladi-excavations-kondagai-burial-site-city-of-the-dead

Keeladi Excavations: बापरे ! आपण असे दिसायचो अडीच हजार वर्षांपूर्वी ! रहस्य मृतांच्या शहराचे

News Trending

How Did Ancient Indians Look 2,500 Years Ago : स्नॅपचॅट किंवा वेगवेगळे फिल्टर लावून आपण आपले फोटो काढतो. त्यात टक्कल,तर लहानपणी आपण कसे दिसायचो, म्हातारपणी कसे दिसू असे फिल्टर असतात. अगदी आपण रिल्स बनवतानाही त्याचा वापर करतो. पण आता आपण अडीच हजार वर्षांपूर्वी कसे दिसायचो, तेही समजणार आहे, कसे ते पाहूया…

तामिळनाडूमधील मदुराई कामराज विद्यापीठामध्ये असलेल्या प्रयोगशाळेत इतिहासाला पुन्हा जिवंत करण्याचं काम सुरू आहे. तेही एका दातावरून…येथील संशोधकांना कोंडगाई या पुरातत्त्वीय स्मशानभूमीतून २,५०० वर्षांपूर्वीचा जुना सापडलेला दात सापडला आहे. हा दात एका मानवी कवटीचा भाग भाग आहे. याच कवटीबरोबर आणखी एका पुरुषाची कवटी सापडली आहे. या दोन्ही कवटींचा वापर करून डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चेहऱ्यांची पुनर्निर्मित करण्यात आली आहे.

फॉरेन्सिक अँथ्रोपॉलॉजी आणि 3D (थ्रीडी) मॉडेलिंगच्या मदतीने संशोधकांनी या प्राचीन भारतीयांचे चेहेरे घडवले आहेत. त्यामुळे २५ शतकांपूर्वी या भूमीत राहणाऱ्या लोकांचे रूप आपल्याला दिसणार आहे.

कोंडगाईला मृतांचे शहर का म्हणतात ?
कोंडगाई या ठिकाणी आतापर्यंत सुमारे ५० विशाल मडकी सापडली आहेत. या मडक्यांमध्ये मृतांचे अवशेष ठेवलेले होते आणि त्यांच्याबरोबर धान्य, मातीची भांडी व इतर दैनंदिन वस्तूही दफन केल्या जात होत्या. यावरून या समाजातील अंत्यसंस्कार केवळ प्रथेसाठी नसून गूढ धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असलेल्या विधींचा भाग होते हे स्पष्ट होते. कोंडगाई शहरामध्ये केवळ मृत व्यक्तींना दफन केले जाई, तर त्याच्या जवळचं किलाडी हे शहर केवळ जिवंत व्यक्तींसाठी होत

चेहऱ्यांचं पुनर्निर्माण कसं करण्यात आलं?
कोंडगाईतील मानवी कवट्यांनी २५०० वर्षांपूर्वी भारतीय कसे दिसत होते, याचा जणू शोधच लावला आहे. कारण, हाडं फक्त मृतांचे अवशेष नसतात, तर ती त्यांची ओळख, त्यांचं आरोग्य, आहार आणि स्वरूप याबद्दलही माहिती देतात. संशोधकांनी डिजिटल फेशियल रिकन्स्ट्रक्शन पद्धत वापरली. प्रथम कवट्यांचे 3D (थ्रीडी) स्कॅन घेतले. त्यानंतर सायंटिफिक डेटानुसार पेशींच्या जाडीचे मोजमाप केले गेले, त्यावरून चेहऱ्यावरील स्नायू व त्वचेचे थर तयार करण्यात आले. हळूहळू कपाळ, गाल, डोळ्यांच्या कडा, नाक आणि ओठ आकारास घेऊ लागले. शेवटी संगणकाच्या पडद्यावर दोन प्राचीन पुरुषांचे वास्तवदर्शी चेहरे उभे राहिले. हे चेहरे शंभर टक्के अचूक असल्याचा दावा करता येत नाही. पण ते शास्त्रीय पद्धतींवर आधारित असल्यामुळे त्या काळातील लोकांचा वास्तविक अनुभव देतात.

Leave a Reply