What is the mean of xerox
What is meaning of Xerox : लहानपणापासून ते अगदी म्हातारे-पेन्शनवाली लोकही झेरॉक्स (Xerox) काढत असतात. कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात जाऊन दादा एक झेरॉक्स द्या असं म्हणतात. ऑफिसमध्ये तर याची झेरॉक्स आणा हे वाक्य तर कॉमन आहे. अगदी स्टेशनरीच्या दुकानांवर xerox मिळतील असं लिहिलेलं असतं. सरकारी कार्यालयांमध्ये तर याची झेरॉक्स आणा त्याची झेरॉक्स जोडा असं सहजपणे म्हणतो.
कॉलेज असो, सरकारी ऑफिस असो किंवा अगदी कोपऱ्यावरचं स्टेशनरीचं दुकान, झेरॉक्स हा शब्द इतका अंगवळणी पडलाय की, ‘फोटो कॉपी’ हा मूळ शब्द कुणाला आठवतच नाही. जसं पाणी मागण्याऐवजी आपण बिस्लेरी द्या म्हणतो तसं… पण झेरॉक्सचा खरा अर्थ कळला तर तुम्ही कधी झेरॉक्स मागणार नाही.
फोटोकॉपी द्या म्हणण्याऐवजी आपण झेरॉक्स द्या असं सहजपणे म्हणतो. पण गंमत अशी की, झेरॉक्स हा प्रत्यक्षात शब्द नाही, तर ते एका अमेरिकन कंपनीचं नाव आहे, ज्यानं जगभरात कॉपी मशीनचं साम्राज्य निर्माण केलं.१९३८ मध्ये चेस्टर कार्लसन (Chester Carlson) नावाच्या संशोधकाने ‘झेरोग्राफी’ नावाची प्रक्रिया शोधली आणि शाई किंवा कार्बन पेपरशिवाय फोटोकॉपी काढणं शक्य झालं. याच तंत्रज्ञानावर आधारित ‘Xerox 914’ नावाचं पहिलं प्लेन पेपर कॉपियर मशीन १९५९ मध्ये आलं आणि ते इतकं गाजलं की, कंपनीचं नावच ‘Xerox Corporation’ पडलं. या मशीनच्या अफाट यशामुळे ‘झेरॉक्स’ हा शब्द हळूहळू ‘फोटो कॉपी’साठी पर्याय बनला आणि लोकांच्या जिभेवर तो कायमचा बसला.
Narendra Modi : नरेंद्र मोदीच नसते तर….
भारतही त्याला अपवाद ठरला नाही. येथेही “झेरॉक्स काढा,” “झेरॉक्स कर,” किंवा “एक झेरॉक्स दे ना” ही वाक्य कॉमनली वापरू लागतो. पण प्रश्न असा की, हा शब्द इतका वापरला जातो आणि तरीही कधी आपण विचार केला आहे का की, मराठीत झेरॉक्सला नेमकं काय म्हणतात? हा इंग्रजीतून आलेला शब्द इतका लोकप्रिय झाला की, मूळ शुद्ध शब्द शब्दकोशात बंदिस्त राहिला आणि व्यवहारात तो कुणाच्या तोंडावर आलाच नाही. म्हणूनच तुम्ही जर एखाद्या झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन शुद्ध मराठी शब्द वापरला, तर दुकानदार गोंधळून जाईल; पण ‘झेरॉक्स’ म्हटल्याबरोबर लगेच ’कॉपी’ मिळेल. झेरॉक्सला मराठीत ‘छाया प्रत’, ‘प्रतिमुद्रा’ असे प्रतिशब्द आहेत. पण, ते शब्द आता लोकांना ऐकायला इतके वेगळे वाटतात की, व्यवहारात आपण सगळे फक्त ‘झेरॉक्स’ शब्दच वापरतो.
हा प्रकार फक्त झेरॉक्सपुरता मर्यादित नाही. ‘गूगल’, ‘बिसलेरी’, ‘थर्मॉस’सारख्या अनेक ब्रँड नावांनी मूळ शब्दावर अधिराज्य गाजवलंय. सर्च कर च्या ऐवजी गुगल कर. पाणी देच्या ऐवजी बिसलेरी दे म्हणतो. तसं फोटोकॉपी च्या ऐवजी आपण झेरॉक्स दे म्हणतो. तर झेरॉक्स हे एका कंपनीचं नाव आहे हे लक्षात घ्या…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…