महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Devendra Fadnavis Announces Maharashtra Flood Relief Package : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. याबाब आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत ही घोषणा केली आहे.
डॉक्टरांचे Handwriting ठरले 7 हजार मृत्यूंचे कारण! सुवाच्च अक्षरात Prescription लिहिणे आता बंधनकारक
Kantara History: ‘कांतारा’मध्ये दाखवण्यात आलेले पांजुर्ली-गुलिगा देव आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांचा अद्भुत इतिहास
सरकार कडून विविध स्तरांवर महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कशी मिळणार मदत?
१. १ कोटी ४३ लाख ५२ हजार २८१ हेक्टर जमिनीवर लागवड
२. त्यापैकी ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान
३. काही जमिनींवर अंशत: पण मोठ्या प्रमाणावर पूर्णत: नुकसान
४. साधारण २९ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान, २५३ तालुक्यांमध्ये सरसकट मदत होणार
५. ६५ मिलिमीटरची अट ठेवलेली नाही.
६. १०० टक्के घरं गेलेल्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेत पूर्णपणे नवीन घर समजून पैसे दिले जातील.
७. अंशत: पडझड झालेल्या घरांनाही मदत
८. दुकानांचं नुकसान झालंय. ५० हजारांपर्यंतची मदत केली जाईल
९. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रुपयांपर्यंत प्रती जनावर मदत
१०. एनडीआरएफमधील तीन जनावरांची मर्यादा काढली आहे.
११. ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२ हजार रुपये प्रतिजनावर
१२. कोंबड्यांसाठी १०० रुपये प्रतिकोंबडी मदत दिली जाईल
१३. खरडून गेलेल्या जमिनींसाठी ४७ हजार रुपये हेक्टरी रोख आणि ३ लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून दिले जातील.
१४. बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून ३० हजार रुपये प्रतिविहीर दिले जातील.
१५. पायाभूत सुविधांच्या नुकसानीची भरपाई म्हणून १० हजार कोटींची तरतूद.
१६. दुष्काळावेळच्या सर्व उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जातील. त्या जमीन महसुलात सूट, कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाची वसुली, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा सर्व गोष्टी लागू केल्या आहेत.
१७. पीकनुकसान भरपाईसाठी ६५ लाख हेक्टर जमिनीसाठी ६१७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय
१८. रबीच्या पिकासाठी प्रतिहेक्टरी अतिरिक्त १० हजार रुपये दिले जातील.
१९. एकूणमध्ये कोरडवाहूसाठी हेक्टरी १८ हजार ५००, हंगामी बागायतीला २७ हजार तर बागायती शेतकऱ्याला ३२ हजार ५०० रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय
२०. ४५ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला आहे. त्यांना वरील मदतीव्यतिरिक्त पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साधारण १७ हजार हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील.
२१. राज्य सरकारच्या वतीने नुकसान भरपाईसाठी एकूण ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज दिलं जात आहे.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…