जर मुख्यमंत्रीचं सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी जनसुनावणीदरम्यान एका अज्ञात इसमाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुख्यमंत्र्यांचा हात धरत त्यांचे केस ओढले व त्यांच्या कानशीलात लगावली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी जनसुणावणीचा (जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरू केलेला साप्ताहिक उपक्रम) सार्वजनिक कार्यक्रम सुरू होता. यावेळी एक तरूण आपली कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्याच्या जवळ गेला. कागदपत्रे खाली ठेवताच त्याने गुप्ता यांचा हात धरून त्यांना ओढले आणि कानशीलात वाजवली. यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. कार्यकर्ते आणि त्या इसमामध्ये धक्काबुक्की झाली. धक्काबुक्की सुरू असताना रेखा गुप्ता यांना धक्का लागल्याने त्यांचे डोकं एका टेबलावर आदळलं.
तेथे उपस्थित असलेले कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडून मुख्यमंत्री आवासातील पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव राजेश भाई खिमजी असे आहे. हा गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहे. राजेश त्याच्या तुरूंगात असलेल्या नातेवाईकाला सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. याच संदर्भात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळावी यासाठी तो त्यांना भेटायला गेला होता.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…