Random News

Delhi Blast:दिल्लीच्या स्फोटाचं कारण बाबरी मशीद पाडल्याचा बदला, वाचा सविस्तर

दिल्लीमध्ये १० नोव्हेंबर २०२५ ला घडलेल्या कार स्फोटाने देश हादरला. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक नागरिक जखमी झाले. लाल किल्ल्याच्या जवळील बाजारपेठेत जोरदार स्फोट झाला, आणि अजूनही त्या ठिकाणी मृतदेहांचे अवयव आढळून येतायत. प्रकरणाच्या तपासासाठी NIA ने ‘स्पेशल 10’ अधिकाऱ्यांची टीम तयार केली आहे आणि या विशेष पथकाचं नेतृत्व मराठी आयपीएस अधिकारी विजय साखरे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

ह्या दहशतवादी कटाला ‘व्हाईट कॉलर’ मॉड्युल असे नाव देण्यात आले. या मॉड्युलमागील मुख्य दहशतवादी उमर नबी असल्याचे समोर आलं. १० नोव्हेंबरला झालेल्या स्फोटापूर्वी पोलिसांनी फरिदाबाद येथून तब्बल २९०० किलो स्फोटक जप्त केली होती. या स्फोटप्रकरणी ‘जैश-ए-मोहम्मद’ दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले. हे मॉड्युल लाल किल्ल्याबरोबर दिल्ली आणि एनसीआरमधील इतर पाच ठिकाणी स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. या कटाचा मूळ हेतू बाबरी मशीद पाडली गेल्याचा ६ डिसेंबर १९९२ बदला घेणे हा होता‌.

या प्रकरणात उल्लेखनीय बाब म्हणजे, ३२ गाड्यांमध्ये बॉम्ब आणि स्फोटके बसवून देशभरात ३२ ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. स्फोट घडवून आणण्याच्या कामासाठी दहशतवाद्यांनी सुमारे ३० लाख रुपये जमा केले होते. हे पैसे हवालाच्या माध्यमातून उमरला मिळाले. २६००० किलो स्फोटक केवळ तीन लाख रुपयांना खरेदी केली गेली. हरियाणातील नूह आणि गुरुग्राम येथून ही स्फोटके आणण्यात आली होती. या दहशतवादी कटामध्ये डॉ. मुझम्मील, डॉ. आदिल, डॉ. शाहीन आणि उमर या सर्वांचा सक्रिय सहभाग होता‌.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर व ७ डिसेंबर या दिवशी विविध ठिकाणी स्फोट घडवण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली होती. हे सगळे स्फोट दिल्लीसह एनसीआरवरील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी घडवायचे होते.

या घटनेमुळे दिल्ली आणि एनसीआर मधील सुरक्षा व्यवस्था पुन्हा तपासली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक गंभीर गोष्टी समोर येत आहेत. स्फोटक सापडणे, आंतरराष्ट्रीय पैशांची देवाणघेवाण, ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी ‘व्हाईट कॉलर’द्वारे कट – या सर्वाचा समन्वय धक्कादायक आहे. देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कटकारस्थानांबद्दल जनजागृती आणि दक्षता ठेवण्याची आवश्यकता या घटनेच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे‌.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

18 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

18 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago