Navaratri 2025 : फॅशन की अध्यात्म? नवरात्रीच्या नऊ रंगाची  स्टोरी… 

News

Navaratri 2025 Navaratri Colour : गणपती झाले की सगळ्यांना वेध लागतात ते नवरात्रीचे. दांडिया -गरबा खेळण्यासह रंग फॉलो करण्याकडे लोकांचा अधिक कल असतो. अगदी मुली तर नवीन नवरात्रीच्या रंगाचे कपडे घेऊही लागल्या असतील. स्टेशन, कॉलेज, रस्ते, ऑफिस यामध्येही नवरात्रीच्या नऊ रंगांचे कपडे घालून सगळे दिसतात. अनेक स्त्रिया तर आदल्या दिवशी उद्या कोणता रंग आहे, त्याची साडी कपाटातून बाहेर काढणे, त्यावर मॅचिंग ब्लाऊज, ज्वेलरी याची अगदी तयारी करुन ठेवतात. कॉलेजला जाणारी तरुणी असेल तर तीही दुसऱ्या दिवशीच्या रंगांप्रमाणे कपडे परिधान करते. 

अगदी मुलं-पुरुष सुद्धा हा ट्रेंड फॉलो करतात. कधी एकदा नवरात्रीचे रंग कळतात आणि शेअर करतो असं युथ ला होतं.  पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, हे नवरात्रीचे रंग कोण ठरवतं आणि कसे ठरवले जातात ? 

खरंतर नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्यामागे कोणतंही धार्मिक कारण नाही. तसेच याचा पाप-पुण्य, भविष्य याच्याशी काहीही संबंध नसतो. आपण त्या दिवशी त्या रंगाची वस्त्रे परिधान केली नाहीत तर पाप लागते किंवा देवीचा कोप होतो, असे काहीही नाही… पण मग याचा संबंध आहे तरी कशाशी? परंतुआज मात्र आपण यामागे दडलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्यामागे कोणतंही धार्मिक कारण नाही. तसेच याचा पाप-पुण्य, भविष्य याच्याशी काहीही संबंध नसतो. आपण त्या दिवशी त्या रंगाची वस्त्रे परिधान केली नाहीत तर पाप लागते किंवा देवीचा कोप होतो, असे काहीही नाही. फक्त त्या दिवसाच्या वारावरुन हे रंग ठरवले जातात. आपल्याकडे ग्रंथामधून प्रत्येक वाराला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यावरुनच हे रंग ठरवले जातात. यात एकच गोंधळ असतो तो म्हणजे आपल्याकडे सात वार आहेत. मग जे दोन वार परत येतात, त्यादिवशी त्या रंगाचा ‘सिस्टर कलर’ म्हणजे त्याच्या जवळचा रंग त्या दिवसासाठी निवडला जातो. 

यामागचा उद्देश एकच तो म्हणजे सर्वांना आपण एकच आहोत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, यासाठी हे केलं जाते. याचा कुठेही, कोणत्याही ग्रंथात उल्लेख नाही. आपण एकाच रंगाचे कपडे परिधान केले तर आपल्याला सामाजिकदृष्ट्या सुरक्षित वाटते. एकीची आणि समानतेची भावना प्रत्येकात निर्माण होते आणि त्यासोबतच आनंद मिळतो. कोणीही न सांगता अनेकजण त्या त्या रंगाचे कपडे परिधान करतात. 

काय आहे या रंगांचे महत्त्व –

पांढरा रंग 

नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग बिनचूकपणा आणि खरेपणा दाखवण्यासाठीही वापरला जातो. साधेपणा आणि सात्विकता या रंगातून दिसते. हा सर्वात शांत रंग मानला जातो. तसेच त्या रंगाला शुद्धतेचे प्रतीकही मानले जाते.

लाल रंग

वैज्ञानिकदृष्ट्या लाल रंग हा शरीराची ऊर्जा प्रभावित करतो. लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो. लाल रंग धोका आणि सावधपणा दर्शविण्यासाठी वापरला जातो. लाल रंग हा अतिशय आकर्षक असतो. लाल रंगाचा वापर घरातील सर्व शुभ कार्यासाठी प्रथम केला जातो. कपडे किंवा पूजेची फुले यासाठी लाल रंगाची प्रथम निवड केली जाते. याशिवाय लाल रंगात ऊबेची भावनाही असते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाल रंग आत्मविश्वास वाढवतो. 

निळा रंग

निळा रंग हा शांततेचं प्रतीक, शीतलता आणि स्निग्धता दर्शवतो. निळ्या रंगाचा मेंदूवर चांगला प्रभाव पडतो. निळा रंग हा बौद्धिक क्षमता वाढवण्याचेही काम करतो. समुद्र आणि आकाश यामध्ये निळ्या रंगाची अनुभूती मिळते.

पिवळा रंग 

प्रत्येक शुभ कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो. पिवळा रंग हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करतो. हा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो. मनोविज्ञानातील सगळ्यात शक्तिशाली आणि अवघड अशी पिवळ्या रंगाची ओळख आहे. बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांततेसाठी पिवळ्या रंगाचे महत्त्व अधिक आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते.

हिरवा रंग 

हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो. या रंगाचे निसर्गाशी आणि भूमीशी अतूट नाते आहे. या रंगाचे नाते निष्ठा आणि समृद्धीशी आहे, असे मानले जाते. सौभाग्याचे प्रतीक म्हणूनही हिरव्या रंगाची ओळख आहे.

राखाडी रंग  

राखाडी रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे वाईट गोष्टींचा नाश. स्थिरतेचा, सुरक्षिततेचा, कौशल्याचा, शिस्तबद्धतेचा रंग म्हणून याकडे पाहिले जाते.

नारंगी रंग

हा रंग क्रियाशक्ती, उत्साह, अभिमान आणि भरभराट याचं प्रतिक मानला जातो. हा रंग स्वातंत्र्य दर्शवणारा आहे. हा रंग लाल आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण आहे. त्यामुळे हा रंग शक्ती, उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित रंगआहे, असे मानले जाते. हा रंगाशी पावित्र्यही जोडलेले आहे.

मोरपंखी रंग 

मोरपंखी विशेषता आणि व्यक्तिमत्त्व दर्शवतो. हा रंग महागौरी देवीचा खूप आवडीचा असल्याचे म्हटले जाते. या रंगाच्या नावाप्रमाणेच हा रंग सद्‍भावना, सुंदरता, समृध्दी याचे प्रतीक आहे. हिरव्या आणि निळ्या रंगाच्या मिश्रणाने हा रंग तयार होतो.

गुलाबी रंग

प्रेम, जिव्हाळा, भावना आणि सृजनाचे प्रतीक म्हणून या रंगाकडे पाहिले जाते. हा रंग स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी वापरला जातो. प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबी रंगाला विशेष महत्त्व आहे.

जांभळा रंग  

जांभळा रंग हा लाल आणि निळा या रंगाच्या मिश्रणाने तयार झाला आहे. या रंगात निळ्याची स्थिरता आणि लाल रंगाची ऊर्जा दिसून येते. या रंगाचा शरीर, मन बुद्धी आणि आत्मा या साऱ्यांवर खोल प्रभाव पडतो. जांभळा रंग आवडणारे लोक शोधक वृत्तीचे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साही. मानवतावादी, नि:स्वार्थी, शांतताप्रिय, समाधानी, दूरदर्शी असतात, असे मानले जाते.

Leave a Reply