Maharashtra celebrate 5 dasara Melave
Dasara Melava 2025 Maharashtra Update : महाराष्ट्रासाठी दरवर्षी दसरा मेळावा फार महत्त्वाचा आहे. कारण याच दसरा मेळाव्याच्या दिवशी राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी योजना, विधानं केली जातात. दरवर्षी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा असतो. मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचाही दसरा मेळावा भरतो. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यादेखील भगवानगडावर आपला वेगळा दसरा मेळावा घेतात. तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे हेदेखील नारायण गडावर आपला दसरा मेळावा आयोजित करत आहेत. त्यामुळेच आता दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी कोणत्या नेत्याचा दसरा मेळावा कुठे होणार? पाहूया…
उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा
शिवसेनेमध्ये बंड होण्याआधी दरवर्षी मुंबईतील शिवाजी मैदानावर या पक्षाचा मोठा दसरा मेळावा आयोजित केला जायचा. मात्र आता या पक्षाचे दोन गट पडल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी मैदानावर आयोजित केला जातो. यावेळीदेखील हा दसरा मेळावा शिवाजी मैदानावरच होणार आहे. यंदाचा दसरा मेळावा अनेक अर्थांनी वेगळा ठरण्याची शक्यता आहे. कारण या मंचावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते युतीचीही घोषणा करू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी आपल्या भाषणात काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मेळावा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आपला दसरा मेळावा आयोजित करतात. आपल्या दसरा मेळाव्यात ते शिवसैनिकांना संबोधित करतात. या वर्षी त्यांचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार होता. आता मात्र त्यांच्या मेळाव्याचे ठिकाण बदलण्यात आले असून तो यंदा आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को येथे दसरा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे हेदेकील रात्री सात ते नऊ वाजेच्या दरम्यान दसरा मेळाव्यासाठी आलेल्यांना संबोधित करत असतात. त्यामुळे यावेळच्या दसरा मेळाव्यात शिंदे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा
मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांचाही बीड जिल्ह्यात दसरा मेळावा होणार आहे. बीडच्या नारायणगडावर या दसरा मेळाव्याची तयारी सुरू झालेली आहे. दरवर्षी नारायणगडावर पारंपरिक पद्धतीने दसरा मेळावा संपन्न होत असतो. गेल्यावर्षी देखील लाखोंच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा संपन्न झाला होता. या दसरा मेळाव्याची 350 एकरवर तयारी सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. पार्किंसह एकूण 900 एकर जमीन दसरा मेळाव्यासाठी तयार केली जात आहे.
भगवान गडावर दसरा मेळावा
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यादेखील दरवर्षी दसरा मेळावा घेतात. त्यांचा हा मेळावा बीड जिल्ह्यातील भगवान गडावर होत असतो. यावेळीही पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी भव्य मंच उभारण्यात येणार असून मंडपही टाकला जाणार आहे. या मेळाव्यासाठी हेलिपॅड देखील तयार करण्यात आले असून हेलिकॉप्टरने मंत्री पंकजा मुंडे 11 वाजता मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होतील. सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी त्या ध्यान मंदिरात जाऊन पूजा करतील. त्यानंतर 11.30 वाजता मूर्तीपूजन करुन 11.45 वाजता उपस्थितांना संबोधित करतील.
संघाकडून शस्त्रपूजन
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी संघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी संघाकडून शस्त्रपूजन केले जाते. यंदाच्या विजयादशमीपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत आपल्या भाषणात स्वयंसेवकांना नेमका कोणता उपदेश करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्या भाषणाकडेही संपूर्ण देशाचे लक्ष असेल.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…