Dasara Celebration in Shrilanka 2025:देशभरात आणि जगभरात आज दसऱ्याचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी रामाने लंकेचा राजा रावणाचा वध केला होता. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही दसरा साजरा केला जातो. या उत्सवाच्या दिवशी रावणासह मेघनाद आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचेही दहन केले जाते. पण दसरा फक्त भारतातच नाही, तर रावणाच्या घरी श्रीलंकेतही साजरा केला जातो.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की श्रीलंकेत दसरा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. येथे माता सीता आणि राम-हनुमान यांची अनेक मंदिरे असून तेथे दसऱ्याच्या दिवशी मोठी गर्दी असते. दसऱ्याला श्रीलंकेला भेट देण्याचा एक वेगळाच आनंद आहे. भारतात दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, पण श्रीलंकेत या दिवशी लोक काय करतात? शेजारच्या देशात दसरा कसा साजरा केला जातो, हे जाणून घेऊया.
भारताप्रमाणे श्रीलंकेतही दसरा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देवाची पूजा करताना आणि भक्तिगीते ऐकताना लोक एकमेकांना भेटतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. पण इथे एक गोष्ट विशेष आहे की दसऱ्याच्या दिवशी श्रीलंकेत रावण दहन केले जात नाही. श्रीलंकेत लोक रावणाचा पुतळा जाळण्याऐवजी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. येथे लोक मंदिरात जाऊन प्रार्थना करतात. सीता अम्मान मंदिर,कटारगामा मंदिर, श्री अजनेय मंदिर या ठिकाणी दसरा सण मोठ्या धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. इथे रावणाचा वध न करता धार्मिक कार्यक्रम होतात. हिंदू आणि बौद्ध हे दोन्ही धर्मसंप्रदाय हा सण साजरा करतात. या वेळी मोठ्या प्रमाणावर भेटवस्तू, मिठाई वाटली जाते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
