Daily horoscope 24 august 2025 : भाद्रपद प्रतिपदा बदलणार ‘या’ राशींचे नशीब; वाचा 12 राशींचे राशीभविष्य

Lifestyle News

मेष :
नवीन कामासाठी योजना आखाल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. प्रवासाचे योग आहेत.

वृषभ :
ग्रहस्थिती थोडी मिश्र आहे. खर्च वाढेल पण उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, जुन्या आजाराची लक्षणं वाढू शकतात. नोकरीत स्पर्धा वाढेल, शांतता राखा.

मिथुन :
जुने अडथळे दूर होतील. व्यावसायिक क्षेत्रात नवीन करार मिळू शकतात. नातेवाईकांशी संपर्क वाढेल आणि कौटुंबिक आनंद वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल. आर्थिक लाभाची संधी.

कर्क :
आजचा दिवस धावपळीचा राहील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. मानसिक ताण टाळण्यासाठी ध्यानधारणा उपयोगी ठरेल. प्रिय व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात.

सिंह :
आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ वेळ. आत्मविश्वासामुळे यश मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी लाभतील. नातेसंबंध दृढ होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

कन्या :
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आजारपणावर मात करून आरोग्य सुधारेल. नोकरी व व्यवसायात काहीसा अडथळा संभवतो. संयम ठेवा. जुनी उधारी वसूल होण्याची शक्यता आहे.

तूळ :
आज प्रवासाचा योग आहे व तो यशस्वी होईल. आर्थिक लाभाची संधी मिळेल. मित्र-परिवारासोबत वेळ आनंदात जाईल. नोकरीत सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. नव्या नातेसंबंधांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक :
अचानक आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती किंवा जबाबदाऱ्या वाढतील. कौटुंबिक वातावरणात उत्साह राहील. प्रिय व्यक्तींकडून आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

धनु :
विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधनात कार्यरत लोकांसाठी चांगला दिवस. परदेशी संधी मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. कौटुंबिक स्तरावर शुभ कार्याचे वातावरण निर्माण होईल.

मकर :
घरातील मोठ्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरीत मेहनतीला यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. सामाजिक कार्यात भाग घेण्याची संधी.

कुंभ:
मित्रांकडून आधार व सहकार्य मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात सकारात्मक बदल होतील. आरोग्य सुधारेल. अचानक प्रवासाचा योग आहे. वैवाहिक जीवनात सौख्य वाढेल.

मीन :
आध्यात्मिक कार्याकडे कल वाढेल. प्रेमसंबंध दृढ होतील. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल आहे. व्यवसायात नफा होईल. घरात शुभकार्याची चर्चा होऊ शकते. मानसिक समाधान मिळेल.

Leave a Reply