Tulsi Vivah 2025
Tulsi vivah 2025: २ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जाईल. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या योगिक निद्रेमधून जागे होतात. या चार महिन्यांना चातुर्मास असे म्हणतात. हिंदू धर्मात शुभ कार्य भगवान विष्णू जागे झाल्यानंतरच सुरू करतात असे मानले जाते. या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो.पण तुम्हाला माहीत आहे का, जालंधर राक्षसाची पत्नी असणाऱ्या तुळशीचं विष्णूसोबत का लग्न केलं जातं… जाणून घेऊया
तुळशी माता यांचं गणेशावर प्रेम होतं आणि त्यांच्याशी त्या विवाह करू इच्छित होत्या. कथेनुसार, एक दिवशी तुळस आपल्या मनातील इच्छा व्यक्त करण्यासाठी थेट गणेशाकडे गेली. तिने नम्रपणे गणेशाला आपल्या भावना व्यक्त केल्या आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. असं असताना गणेशाने तिचा विवाह प्रस्ताव नाकारला. हा नकार तुळशीसाठी खूप दु:खद आणि अमपानकारक होता. तिची भक्ती आणि प्रेम असूनही गणेशाने ते शक्य मानले नाही. परिणामी तुळस संतापली आणि तिने गणेशाला शाप दिला की त्यांची दोन लग्न होतील. तुळशीच्या शापामुळे गणेश संतप्त झाले आणि त्यांनी तुळशीलाही शाप दिला. गणेशानी तुळशीचं लग्न एका राक्षसाशी होईल असा शाप दिला. त्यानुसार तिचा विवाह राक्षस कुळातील राजा जालंधरशी झाला.
नारद पुराणानुसार, राक्षसांचा राजा जालंधर याच्या अत्याचारांमुळे ऋषी-मुनी, देवता त्रस्त झालेले. तो खूप पराक्रमी आणि बलाढ्य होता. त्याची पत्नी वृंदा पतिव्रता होती आणि तिच्या पुण्याचं फळ म्हणून जालंधर कधीच पराभूत होत नव्हता. जालंधरच्या त्रासाला कंटाळून सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले आणि त्याला हरवण्याचा पर्याय विचारला. तेव्हा विष्णूने वृंदाचा पतिव्रता धर्म खंडित करण्याविषयी सांगितलं. भगवान विष्णूंनी जालंधराचं रुप घेऊन वृंदाला स्पर्श केला. त्यामुळे तिचं व्रत भंग झालं आणि जालंधर युद्धात मारला गेला. भगवान विष्णूंचं कपट आणि पतीच्या निधनामुळे वृंदा दुःखी झाली. तिने भगवान विष्णूंना तुमच्या पत्नीचं कपटानं हरण होईल किंवा तुम्हालादेखील पत्नीवियोग सहन करावा लागेल, असा शाप दिला. शाप दिल्यानंतर वृंदा आपल्या पती जालंधरसोबत सती गेली आणि तिच्या राखेतून तुळशीचं रोप उगवलं. वृंदेचा पतिव्रता धर्म मोडल्याने भगवान विष्णूंना खूप अपराधी वाटलं आणि ‘तू तुळशीच्या रूपात सदैव माझ्यासोबत राहशील’ असा आशीर्वाद विष्णूंनी वृंदाला दिला. ‘कार्तिक शुक्ल एकादशीला शाळिग्राम स्वरूपात माझा विवाह तुळशीसोबत करेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील,’ असं भगवान विष्णूंनी सांगितलं. त्या वेळपासून तुळशी विवाहाची प्रथा सुरू झाली, असं म्हणतात.
तुम्हाला तुळशी विवाहाची कोणती कथा माहीत आहे, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…
कधी काळी स्वतःला भारतीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूने, आज भारताला विश्वविजेता बनवलं आहे. ही…