Crime story Jabari Khabari
Teacher Killed student crime news : २० दिवसांपूर्वी म्हणजे २८ ऑगस्टला मुलगी घरून ट्यूशनसाठी गेली. पण, ती परत आलीच नाही. आईवडिलांनी चौकशी केली, तेव्हा ती ट्यूशनलाही आली नसल्याचे कळले. मग सुरु झाला पोलीस तपास. पोलिसांनी शोध सुरू केला आणि तिचे तुकडे तुकडे तपासाअंती समोर आले. घरातून बाहेर पडलेल्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडेच घरी आले. मुलीची हत्या शिक्षकानेच केल्याचे तपासात आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
Rahul Gandhi PC: VoteChoriचा पुन्हा तगादा! राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Causes of Cancer : कॅन्सर नेमका कशामुळे होतो ? ‘या’ गोष्टी आहेत महत्त्वाच्या ! जाणून घ्या
ही घटना आहे पश्चिम बंगालमधील बीरभूमी जिल्ह्यातील. हत्या करण्यात आलेली मुलगी रामपूरहाट परिसरात आईवडिलांसोबत राहते. श्यामपहाडी येथील शाळेत ती शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर ती घरी यायची आणि नंतर ट्यूशनला जात होती. २८ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे ती ट्यूशनसाठी घरातून बाहेर पडली होती. पण, परत आलीच नाही.
काय आहे घटना
मागील २० दिवसांपासून मुलगी बेपत्ता होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. तेव्हा शाळेतीलच मनोज कुमार पाल या शिक्षकाने तिचे अपहरण केल्याचे तपासातून समोर आले. पोलिसांनी लगेच शिक्षकाला अटक केली.
UPI Cash Withdrawal : ATM शिवाय आता काढता येणार कॅश ! Smartphoneनेच मिळणार १० हजार रुपये !
पोलिसांनी शिक्षकाची चौकशी करत असतानाच पोलिसांकडून तिचा शोधही सुरू होता. रामपूरहाटमधीलच कालीडांगा गावात असलेल्या एका तलावात मृतदेहाचे तुकडे आढळून आले. हे तुकडे बेपत्ता विद्यार्थिनीचेच असल्याचे निष्पन्न झाले. अनेक दिवसांपूर्वी हत्या करून तुकडे पाण्यात फेकले गेले होते. त्यामुळे ते सडू लागले होते. शिक्षकाने मुलीची हत्या का केली आणि हत्या करण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते का? याचाही तपास पोलीस करत आहे. मृतदेहाचे तुकडे सडलेले असल्याने तपासणी करण्यात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…