Lifestyle

Cough Syrup: कफ सिरपमुळे ३० लहान मुलांचा मृत्यू; पालकांनी काय काळजी घ्यावी?

cough syrup child deaths India: मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये दूषित कफ सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू झाल्यानंतर पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता मुलांना कफ सिरप द्यावे की नाही?, हा प्रश्न पालकांना आहे. बहुतांश वेळा लहान मुलांना होणारा सर्दी-खोकला स्वतःहून बरा होणारा (self-limiting) असतो, त्यामुळे सहा वर्षांखालील मुलांना कफ सिरप देण्याची बिलकुल गरज नसते, असे तज्ज्ञ डाॅक्टरांना वाटते. तसेच मुलांना आणि प्रौढांना देण्यात येणाऱ्या कफ सिरपच्या मात्रेत (डोसमध्ये) मोठा फरक असतो, त्यामुळे कोणतेही सिरप डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केवळ फार्मासिस्टच्या सांगण्यावरून घेऊ नये.

Maharashtra Flood Relief Package : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर

डॉक्टरांचे Handwriting ठरले 7 हजार मृत्यूंचे कारण! सुवाच्च अक्षरात Prescription लिहिणे आता बंधनकारक

कफ सिरप दूषित होते म्हणून मृत्यू
सिरप दूषित नसेल, तर योग्य वैद्यकीय प्रोटोकॉल पाळल्यास त्यामुळे मृत्यू होत नाही. डेक्स्ट्रोमेथॉर्फन हायड्रोब्रोमाइड (Dextromethorphan Hydrobromide) हा घटक बहुतांश ओव्हर-द-काउंटर सिरपमध्ये असतो. हे औषध खोकल्यावर नियंत्रण ठेवणारे म्हणजेच cough suppressant आहे – ते मेंदूमध्ये खोकल्याचा रिफ्लेक्स कमी करते. त्यामुळे मूत्रपिंड निकामी होत नाहीत.

भारतातील समस्या काय?

भारतामध्ये कफ सिरप सहज उपलब्ध असतात. ओव्हर-द-काउंटर मिळत असल्याने अनेक कुटुंबे डॉक्टरांचा सल्ला न घेताच थेट औषध घेतात. हाच मुख्य धोका आहे. कफ सिरप घ्यायचेच असेल, तर फक्त आणि फक्त डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधच घ्या.

ओव्हरडोस झाल्यास काय होते?
कफ सिरप जास्त प्रमाणात दिल्यास मुलांमध्ये झोप येणे, थकवा, हृदयाचे ठोके वाढणे, उलट्या आणि मळमळ अशी लक्षणे दिसतात. किशोरवयीन मुलांमध्ये मात्र याचे परिणाम अधिक गंभीर असू शकतात. ‘गुंगी’ येण्यासाठी किशोरवयीन मुलं या सिरपचा दुरुपयोग करतात, असेही तज्ज्ञांना लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांना त्याचे व्यसन लागण्याची शक्यता अधिक असते.

मुलांसाठी योग्य मात्रा किती असावी?
फॅमिली डॉक्टरलाही अनेकदा लहान मुलांना वजनानुसार सिरप किती द्यायचे हे माहीत नसते. त्यामुळे बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरतो.
मुलांसाठी औषधाचे मोजमाप मिलिग्रॅम प्रति किलो वजनानुसार ठरवले जाते. साधारण 0.5 ते 1 मिग्रॅ प्रति किलो इतकी मात्रा, दिवसातून जास्तीत जास्त तीनवेळा देता येते. सिरपसोबत येणारा dosing spoon किंवा कप अथवा औषधासोबत येणारे मोजमापाचे बूच यांचा वापर करावा. घरातील साध्या चमच्याचा वापर औषधासाठी केल्यास ओव्हरडोसची शक्यता अधिक असते.
चार वर्षांखालील मुलांना डॉक्टरांनी काही विशेष परिस्थितीत सिरप द्यायचे ठरवलेच, तर ते लिहूनच देतात उदाहरणार्थ -कोणती मात्रा, किती वेळा, किती दिवस इत्यादी.

कफ सिरप घेताना काय तपासावे?
बहुतांश कफ सिरपमध्ये Dextromethorphan (cough suppressant) आणि त्यासोबत दोन घटक वापरले जातात – Phenylephrine आणि Pheniramine (decongestants). हे संयुग वापरलेले असल्यास तसे लेबलवर स्पष्ट लिहिलेले असते.
नेहमी विश्वसनीय आणि प्रमाणित औषधनिर्मात्या कंपनीचेच कफ सिरप घ्यावे. स्वस्त औषधे तयार करणाऱ्या अनेक कंपन्या योग्य लेबलिंग करत नाहीत, कफ सिरप कॅनमध्ये किंवा अनधिकृत बाटल्यांमध्ये पुरवतात. अशा ठिकाणी Diethylene Glycol हे स्वस्त सॉल्व्हंट म्हणून वापरतात आणि हाच पदार्थ विषारी व जीवघेणा ठरतो. त्यामुळेच मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू होतात.
Dextromethorphan मुळे मूत्रपिंडावर परिणाम होत नाही; तो nephrotoxic घटक नाही. समस्या दूषित सॉल्व्हंटमुळे निर्माण होते.

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

2 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

3 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

21 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

22 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago