UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी – 1 ऑगस्टपासून व्यवहारामध्ये नवे बदल

Lifestyle News

वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून काही बदल लागू करणार आहेत. हे बदल एनपीसीआय (National Payments Corporation of India) द्वारे केले जाणार आहेत. बॅलेन्स चेक आणि ट्रान्झॅक्शन स्टेटससह अॅपमधील हे बदल इंटरफेस स्थिर आणि कार्यक्षम बनवण्याच्या उद्देशाने केले जाणार आहेत. वापरकर्त्यांना त्यांच्या व्यवहारादरम्यान आता व्यत्यय येऊ नयेत म्हणून NPCI ने हे उपाय केले आहेत.

वापरावर काही मर्यादा आणल्याने पेमेंट सेवांवरील भार कमी होईल ज्यामुळे वापरा करताना कमी व्यत्यय येतील आणि कोणतीही अडचण येण्याची शक्यता कमी होईल.

जाणून घेऊया यूपीआयमध्ये होणारे बदल :

बँक बॅलन्स तपासावर मर्यादा
वापरकर्ते अनेकदा सातत्याने बँक बॅलन्स तपासत असल्याने, अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस(API) सिस्टीमवर प्रचंड ताण येतो, त्यामुळे दिवसातून फक्त 50 वेळा वापरकर्ते त्यांचा बँक बॅलन्स तपासू शकतील. जेणेकरून एपीआय सिस्टीम सुरळीत चालण्यास मदत होईल.

लिंक्ड बॅंक अकाउंट पाहण्यावर मर्यादा
वापरकर्ते मोबाइल नंबरसोबत लिंक केलेले त्यांचे बँक खाते आता दिवसातून फक्त 25 वेळा पाहू शकतील.

ऑटो पेमेंट
नेटफ्लिक्स, स्पॉटीफाय किंवा म्युच्युअल फंड सारखे दरमहिन्याला शेड्यूल केलेले पेमेंट सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत किंवा मग रात्री 9.30 नंतर नॉन-ट्रॅफिक वेळेत होतील.

पेमेंट स्थिती तपासणी मर्यादा
जर एखादे पेमेंट प्रलंबित असेल, तर वापरकर्त्याला त्याची स्थिती फक्त तीन वेळा तपासता येईल. प्रत्येक चेकमध्ये 90 सेकंदांचे अंतर असणार आहे.

पेमेंटची पुष्टी करण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे नोंदणीकृत बँकचे नाव दिसेल, ज्यामुळे चुका आणि फसवणूक टाळता येईल.

NPCI ने 26 जुलै 2025 रोजी दिेलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की ते UPI व्यवहारांचा प्रतिसाद वेळ कमी करून अॅपचा परफार्मंस सुधारण्यासाठी काम करत आहेत. या योजनांमुळे बँका, लाभार्थी बँका आणि फोनपे, गुगल पे आणि पेटिएम सारख्या पेमेंट सेवा देणाऱ्य़ा अॅप्सचा फायदा होईल.

Leave a Reply