सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
राज्यातील सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी वांद्रे (पूर्व) येथे राज्याचे नवे “महाराष्ट्र पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयाची स्थापना १८२१ साली करण्यात आली होती. संचालनालयाचे मुख्यालय सध्या मुंबईतील…
