चित्रपताका: मराठी चित्रपट महोत्सवाची भव्य सुरुवात!
मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्याचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी चित्रपताका महोत्सवाचे शीर्षकगीत देखील प्रकाशित करण्यात आले.कार्यक्रमास चित्रपट सृष्टीतील दिग्गज जसे किरण शांताराम, जब्बार पटेल, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विकास खारगे, स्वाती म्हसे पाटील, मीनल जोगळेकर…
