Horror Story : अमावस्या: एक मंतरलेली रात्र
ग्रामीण भागात प्रत्येकाच्या मनात आजही अमावस्येबद्दल एक वेगळी धास्ती असते. शहरात कदाचित अमावस्येला काहीच महत्त्व नसेल, पण गावाकडच्या परंपरा, गोष्टी आणि अनुभव हे काहीतरी वेगळंच सांगत असतात. गावकऱ्यांच्या मते अमावस्येच्या रात्री अदृश्य शक्ती जाग्या होतात. अदृश्य शक्ती म्हणजे निरनिराळी भुतं. (वेताळ, ब्रम्हग्रह, समंध, देवचार, मुंजा, खवीस, चेटूक, गि-हा, चेटकीन, झोटिंग, वीर, वायंग्या, बावा, म्हसोबा, जखिन,…
