Random News

C. P. Radhakrishnan: महाराष्ट्राचे राज्यपाल झाले देशाचे नवे उपराष्ट्रपती

देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मंगळवार दि. 9 सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू झाली. या निवडणुकीत एकूण 788 मतदारांपैकी 7 जागा रिक्त असल्याने प्रभावी मतदार संख्या 781 होती. त्यापैकी 768 खासदारांनी मतदान केले तर 13 खासदार अनुपस्थित होते. अनुपस्थितांमध्ये BRS चे 4, BJD चे 7, अकाली दलाचा 1 आणि एका अपक्ष खासदाराचा समावेश होता.

या निवडणुकीत NDA कडून तमिळनाडूतील ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उमेदवार होते, तर INDIA आघाडीकडून माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. सुधर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतदानाच्या आकडेवारीवरून NDA उमेदवार राधाकृष्णन यांना स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. NDA कडे लोकसभेत व राज्यसभेत मिळून मजबूत संख्याबळ असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता आणि ही शक्यता खरी ठरली.

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. आता लवकरच उपराष्ट्रपती पदाची धुरा त्यांच्या हाती जाणार आहे. भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती म्हणूनही काम करतो. त्यामुळे या निवडणुकीचे राजकीय महत्त्व मोठे आहे. संसदेतील पुढील सत्रांमध्ये सरकार आणि विरोधकांमध्ये होणारा संघर्ष हाताळण्याची जबाबदारी नव्या उपराष्ट्रपतींकडे असेल.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

18 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

18 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago