Trending

बसचालकाला हार्टअटॅक अन् सलग ९ गाड्यांना धडक, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Bus Driver Heart Attack Video: बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ एका भयानक अपघाताने सगळ्यांचाच थरकाप उडाला आहे. एका बसचालकाला बस चालवताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे बसवरचे नियंत्रण सुटले. त्याचा थरारक अनुभव बसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Eiffel tower:जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पाडणार?
Diwali 2025:ख्रिस्मस मॅगझिन ते दिवाळी अंक: लंडनपासून सुरु झाला मराठी दिवाळी अंकाचा रंजक प्रवास
Diwali 2025:इंग्रजांची ‘ती’ चूक आणि आपल्याला मिळू लागला दिवाळी बोनस! वाचा सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू Metropolitan Transport Corporation (BMTC) च्या एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ एका बसचालकाने त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने बसवरील नियंत्रण गमावले. त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही तो त्या स्थितीमध्येच बसवरील नियंत्रण गमावू नये म्हणून प्रयत्न करीत होता. परंतु, त्या अत्यवस्थ स्थितीमध्येच चुकीने त्याच्याकडून अ‍ॅक्सिलरेटर दाबले गेले. त्यामुळे बस वेगाने पुढे सरकली आणि त्या बसने तीन ऑटोरिक्षा, तीन कार आणि काही बाईकसह एकूण नऊ वाहनांना धडक दिली. हा थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो प्रसंग पाहून लोक भयभीत झाले आहेत.

व्हिडीओतले थरकाप करणारे क्षण
व्हिडीओ सुरू होतो तेव्हा बसचालक बसमधील त्याच्या सीटवर बसलेला दिसतो. काही क्षणांनंतर त्याला अचानक हृदयविकाराचा झटका येतोआणि त्या स्थितीत चुकून त्याच्याकडून अ‍ॅक्सिलरेटर दाबल्यामुळे बस पुढे सरकते. बस प्रथम एका ऑटोरिक्षा व कारला धडक देते आणि नंतर रस्त्यावरील इतर वाहनांना क्रमाने धडक देत पुढे पुढे सरकते. बसमधील वाहक तातडीने हालचाल करून बसवर नियंत्रण मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. त्याला वेळेत नियंत्रण मिळविणे शक्य होत नाही; पण व्हिडीओच्या शेवटी तो ब्रेक लावण्यात यशस्वी होतो. परंतु बसचालक त्या प्रसंगी हृदयविकाराचा झटका आल्याच्या स्थितीतच हालचाल करीत असतो.

सुदैवाने सर्व जण सुरक्षित
The Hindu च्या रिपोर्टनुसार, बसचालकाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि आता त्याची तब्येत स्थिर आहे. BMTC अधिकारी म्हणाले, “सुदैवाने बसमधील कोणालाही इजा झाली नाही. ड्रायव्हरला तातडीने रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असून, तो आता सुरक्षित आहे.” अधिकाऱ्यांनी आणखी सांगितले, “या घटनेत कुणालाही कोणतीही हानी झालेली नाही आणि सर्व जण सुरक्षित आहेत.”

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

30 minutes ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

1 hour ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

19 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

20 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago