News

आशिया कप ट्रॉफी आता भारताच्या दिशेने! नक्वीचा खेळ फसला

Asia Cup 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. मात्र सामन्यानंतर मैदानावर जे घडलं ते क्रिकेटविश्वाला हादरवून टाकणारं होतं.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष असलेला मोहसिन नक्वी याच्याकडून भारताने ट्रॉफी आणि पदकं स्वीकारण्यास नकार दिला. काही वेळ वाट पाहिल्यानंतर ट्रॉफी परत करण्याऐवजी नक्वी ट्रॉफी आणि पदकं उचलून मैदानातून थेट आपल्यासोबत घेऊन गेला.

या घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला. या संपूर्ण प्रकारावर बीसीसीआयने तीव्र नाराजी व्यक्त केली. BCCI ने मोहसिन नक्वीला ACC अध्यक्षपदावरून हटवण्याकरीता प्रयत्न देखील सुरू केले आहेत. बीसीसीआयकडून आशिष शेलार आणि राजीव शुक्ला देखील सहभागी झाले आहेत.

ट्रॉफी आणि पदकं कुठे आहेत याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र ट्रॉफी आणि पदके ACC च्या दुबई ऑफिसमध्येच सुरक्षित असल्याचे समजले. त्यामुळे आता लवकरच भारताकडे ट्रॉफी आणि पदके परत येणार असल्याचे सांगितले जात आहे.

नक्वी पाकिस्तानमधील शाहबाज शरीफ सरकारमध्ये गृहमंत्री असून त्याचबरोबर पीसीबीचा अध्यक्ष आणि एसीसी प्रमुख आहे. या दुहेरी भूमिकेमुळे हितसंबंधाचा संघर्ष निर्माण झाला असून क्रिकेटमध्ये राजकारण घुसवल्याचा आरोप त्याच्यावर केला आहे. बीसीसीआयने कठोर भूमिका घेत, नक्वीने निष्पक्षतेच्या आचारसंहितेचा भंग केला आहे, यामुळे आशिया कपच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

48 minutes ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

2 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

20 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

20 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago