दिवाळीत येणारी बलिप्रतिपदा म्हणजेच बळीराजाचा पाडवा. पौराणिक कथांनुसार बळी नावाचा एक महान, पराक्रमी आणि दानशूर राजा होता. त्याचा जन्म दैत्यकुलातील असला तरी तो विष्णुभक्त प्रल्हादाचा तो नातू होता. बळीने आपला पराक्रम, बुद्धी आणि दानशुरतेने देव, मानव आणि दैत्य या तिन्ही लोकांत आपले साम्राज्य स्थापन केले होते. सर्व प्रजा आनंदी आणि समृद्ध होती.
बळी अत्यंत नीतीमान, धर्मप्रिय होता, पण काळाच्या ओघात त्याला आपल्या सामर्थ्याबाबत गर्व वाटू लागला. त्याने दरबारात माझ्यापुढे देवांचाही काय उपयोग? हा गर्व पाहून देव त्याला घाबरले त्यांनी भगवान विष्णूंकडे मदतीसाठी विनंती केली.
यानंतर भगवान विष्णूनी ठेंगू ब्रम्हचाऱ्याच्या रूपात त्यांनी अवतार घेतला. यावेळी बळीराजा मोठा यज्ञ करत होता. वामन त्या यज्ञात आले बळीला म्हणाले,मला फक्त तीन पीवले एवढी जमीन दान म्हणून द्या. दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी वामनाचे हे रूप ओळखले आणि बळीला सावध केले, पण बळीने आधीच दान देण्याचे वचन दिले असल्याने तो आपल्या शब्दावरून मागे फिरला नाही. जसे बळीने वामनाला दान मान्य केले, तसे वामनाने आपले विराट रूप प्रकट केले. एका पावलात त्यांनी पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात स्वर्ग आणि मग आता तिसरे पाऊल कुठे ठेवू? असे वामनाने बळीस विचारले. तेव्हा बळीराजा म्हणाला, “भगवान, माझे डोके तुमच्या तिसऱ्या पावलासाठी अर्पण करतो.” वामनाने त्याच्या मस्तकावर पाऊल ठेवले आणि त्याला पाताळलोकात पाठवले.
बळीचा भक्तीभाव आणि दानशील वृत्ती पाहून विष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला “तुझ्या स्मरणार्थ लोक दरवर्षी तुझा उत्सव साजरा करतील. तुझ्या नावाने एक दिवस कायम लक्षात राहील.” हा दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा, ज्याला “बलिप्रतिपदा” म्हणतात.
बलिप्रतिपदा हा दिवाळीच्या दुसऱ्यादिवशी म्हणजे अमावास्येनंतरचा पहिला दिवशी साजरा केला जातो. या दिवशी राजा बळी पातळातून पृथ्वीवर येतो, असे कथांमध्ये सांगितले जाते. काही ठिकाणी पिठाची किंवा शेणाची बळीची मूर्ती तयार करून पूजा केली जाते. त्याला पाच पांडव आणि कुंती अशा बाहुल्यांचे रूप दिले जाते. शेतकरी वर्गासाठी हा दिवस महत्वाचा आहे. यावेळी शेतीतील नवीन हंगामाच्या प्रारंभाचे प्रतीक मानला जातो.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…