अलीकडेच रशियात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगा यांची एक गूढ आणि धक्कादायक भविष्यवाणी. बाबा वेंगा यांनी 2025 हे जगाच्या अंताची सुरूवात असेल, असे भाकीत वर्तविले होते. 2025 मध्ये युद्धाचे आणि भूकंपाचे भाकीत तर खरे ठरले आहे. आता ऑगस्ट महिन्याबाबत केलेले भाकीतही खरे ठरते की काय या विचाराने धडकी भरली आहे.
काय आहे भाकीत?
बाबा वेंगांनी 2025 च्या ऑगस्टमध्ये आकाश व पृथ्वीवरून एकाच वेळी (Double Fire) दुहेरी आगीची भविष्यवाणी वर्तवली होती. त्यांनी म्हटले होते की, “आकाश व पृथ्वीवरून एकाच वेळी उसळणाऱ्या दुहेरी आग” असा उल्लेख केला होता. हे विधान फारसे स्पष्ट नसले तरी, इंटरनेटवर या भविष्यवाणीची चर्चा सुरू आहे. त्यांनी केलेली भविष्यवाणी अनेकदा गूढ, आणि कोड्यात असल्याने वेळेनुसारचं या भाकीतांचा उलगडा होतो.
2025 च्या ऑगस्टमध्ये रशिया येथे झालेल्या भूकंपामुळे आणि त्यानंतर उद्भवलेल्या आगीच्या घटनांमुळे लोकं “Double Fire” चा संदर्भ नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित संकटाशी लावत आहेत. हे भाकीत अशा वेळी चर्चेत आलं आहे, ज्यावेळी हवामान तज्ञांनी वाढत्या वनव्यांचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर, खगोल शास्त्राज्ञांनीही सूर्याच्या वाढत्या तापमानाबद्दल सूचित केलं आहे. ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हे भाकीत हवमान बदल, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता किंवा आंतरराष्ट्रीय संकट असू शकते असे म्हटले जात आहे.
बाबा वेंगानी 2025 मध्ये युरोपमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ होईल असा इशारा दिला होता तसेच मोठ्या देशाने जैविक शस्त्रांच्या चाचण्या किंवा हल्ले करण्याची शक्यता वर्तवली होती. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी भयानक हवामान बदल व नैसर्गिक आपत्तींची शक्यता दर्शवली होती. यापूर्वी देखील त्यांनी स्टीलचे पक्षी अमेरिकेवर हल्ला करतील असे सांगितले होते. अनेकांच्या मते 9/11 न्यूयॉर्कच्या ट्विन टॉवर्सवर झालेल्या विमान हल्ल्याशी संबंधित आहे असे सांगितले जाते.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…