“तो आपलाच माणूस आहे!” – संतोष जुवेकरच्या समर्थनार्थ अवधूत गुप्तेची भावनिक साद

बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या ‘छावा’ चित्रपटाने अनेकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. विकी कौशलच्या प्रमुख भूमिकेसोबतच रायाजीच्या भूमिकेत संतोष जुवेकरनेही आपल्या अभिनयाने छाप पाडली. मात्र, एका साध्या विधानामुळे संतोष जुवेकर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बळी ठरला. एकाबाजूला संतोष जुवेकरवरील ट्रोलिंगचा महापूर आलेला असताना दुसऱ्याबाजूला त्याच्या मित्रवर्गातून अनेकांनी सोशल मिडिया पोस्ट करुन भावनिक आधार दिला. आता संतोष जुवेकरचा जवळचा मित्र चित्रपट दिग्दर्शनक, गायक, संगीतकार अवधुत गुप्ते यांनी त्यांच्या सोशल मिडिया हँडलवर भावनिक पोस्ट करीत खऱ्या संतोषची बाजू मांडली आहे. चला तर मग जाणून घेऊ अवधुत गुप्ते नक्की काय म्हणाले?

“मी अक्षय खन्नाशी बोललोच नाही!” – ट्रोलिंगची लाट
‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्नाने साकारली. एका मुलाखतीत संतोष जुवेकरने सहज म्हणालं, “मी अक्षय खन्नाशी बोललोच नाही.” या एका वाक्यावरून सोशल मीडियावर संतोषला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. “त्याचा रोल कितीसा आहे? आणि तो बोलतो किती?” अशा कमेंट्स करत लोकांनी त्याची खिल्ली उडवली. मात्र, हे विधान चुकीच्या संदर्भात सादर करण्यात आलं, असं संतोषने स्पष्ट केलं. “मी अक्षय खन्नाचा मोठा चाहता आहे. पण माझे शब्द चुकीच्या पद्धतीने समोर आले,” असं त्याने सांगितलं.

अवधूत गुप्तेने घेतली संतोषच्या बचावासाठी धाव
या ट्रोलिंगनंतर प्रसिद्ध संगीतकार, गायक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्तेने संतोषच्या समर्थनार्थ एक जबरदस्त आणि भावनिक फेसबुक पोस्ट लिहिली.
“संतोष हा केवळ एक अभिनेता नाही, तर भूमिकांसाठी झोकून देणारा कलाकार आहे. ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एकतारा’ यांसाठी त्याने अपार मेहनत घेतली. भूमिकेत शिरण्यासाठी तो संपूर्ण चित्रिकरण काळात त्या वातावरणात राहतो. ही त्याची ‘मेथड’ आहे, जी आपण स्वीकारायला हवी. मग एका विधानावरून त्याला एवढं ट्रोल करणं योग्य आहे का?”

अवधूत गुप्तेने मराठी कलाकारांच्या संघर्षावरही प्रकाश टाकला.
“मराठी कलाकार एका चित्रपटासाठी वर्षभर मेहनत करतात. पण शुक्रवारी चित्रपट रिलीज झाला की लगेच विचारलं जातं – ‘पुढे काय?’ त्यावेळी त्या कलाकारांकडे उत्तर नतसं” त्यांच्या मेहनतीचं चीज व्हावं यासाठी आपल्यालाच पुढे यायला हवं.”

“तो आपलाच माणूस आहे!” – कलाकारांना पाठिंबा द्या
अवधूत गुप्तेने आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटलं, “छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी अमराठी अभिनेत्याचा स्वीकार आपण केलाच, मग आपल्या घरच्या कलाकारांचं कौतुक करण्यात आपण कमी पडतो का? संतोष जुवेकर हा आपल्यातलाच एक आहे. जर त्याच्याकडून काहीसं विचित्र वागलं असेल, तर त्याला चिडवून झालं! आता पुरे! त्याला जवळ घ्या!”

अवधूत गुप्तेच्या या भावनिक पोस्टमुळे संतोषच्या समर्थनार्थ चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर साथ दिली आहे. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी – कलाकारांची मेहनत ओळखायला हवी, त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे, आणि ट्रोलिंग करण्याआधी सत्य काय आहे हे समजून घेतलं पाहिजे!

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

20 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

20 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago