Asia Cup: भारत-ओमान सामन्या दरम्यान अक्षरला गंभीर दुखापत… Team India चे टेन्शन वाढले!

News Sports

भारतीय संघाने आशिया कप 2025 मधील शेवटचा गट सामना ओमानविरुद्ध 21 धावांनी जिंकत विजयी घोडदौड कायम ठेवली. प्रथम फलंदाजी करत भारताने 20 षटतांत 188 धावा केल्या, तर प्रत्युत्तरादाखल ओमानला केवळ 167 धावा झाल्या. या विजयामुळे टीम इंडियाने सुपर – 4 मध्ये दमदार एन्ट्री केली. आता सगळ्यांचे लक्ष रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरूद्ध भारत या सामन्यावर आहे. मात्र या सामन्या आधीच टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. भारत- ओमान या सामन्यादरम्यान 15 व्या ओव्हरला फलंदाज हमीद मिर्झाची कॅच पकडण्यासाठी अक्षर मिडऑफकडेजवळ धावला. कॅच पकडण्याच्या प्रयत्नात असताना तो तोल जाऊन पडला, यामुळे त्याच्या मानेला आणि डोक्याला जबरदस्त मार लागला. वेदना असह्य झाल्याने सामना सोडून त्याला मैदानाबाहेर जावे लागले. उर्वरित मॅच त्याला खेळता आली नाही, ज्यामुळे टीमसोबतच क्रिकेट चाहत्यांमध्ये देखील काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टीम इंडियाचे कोच टी. दिलीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षरची प्रकृती सध्या स्थिर असली तरी सुपर-4 च्या सामन्यामध्ये तो खेळू शकले किंवा नाही याची शाश्वती नाही. यामुळे टीम इंडियाला त्यांची रणनिती बदलावी लागण्याची आवश्यकता आहे. यामुळे अक्षर पटेलच्या दुखापतीवर BCCI लवकरच निर्णय घेणार आहे. अक्षरच्या बदल्यात वॉशिंग्टन सुंदर किंवा रियान परागची यांची नावे पुढे आली आहेत. अक्षरच्या अनुपस्थितीत या दोघांना खेळण्याची संधी मिळू शकणार आहे.

भारताचा सुपर-४ फेरीतील पहिला सामना रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानविरूद्ध होणार असून त्यानंतर बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यासोबत सामने होतील.

Leave a Reply