Entertainment

राज्य शासनातर्फे यावर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव , सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.

गेल्या ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. मात्र शासनाचा अधिकृत असा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात नाही. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. मात्र शासनाचा अधिकृत असा महोत्सव नसल्याने यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मांडली, त्याला आता मुहूर्त स्वरूप आले आहे.यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटा सोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेल, या निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमनियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने

सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या,पाँडिचेरी,सनी,धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाईंड मेन, समायरा,गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही,ग्लोबल आडगाव,हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे.

तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर(उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी(फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रन सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर,विजय भोपे,श्रीरंग आरस,राजा फडतरे,शरद सावंत,मेधा घाडगे,चैत्राली डोंगरे,विनोद गणात्रा,प्रकाश जाधव,शर्वरी पिल्लेई,जफर सुलतान,देवदत्त राऊत,विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे

• सर्वोत्कृष्ट कथा :
१. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव)
२. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन)
३. सुमित तांबे (समायरा )

• उत्कृष्ट पटकथा :
१. इरावती कर्णिक (सनी)
२. पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन)
३. तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी)

• उत्कृष्ट संवाद :
१. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. मकरंद माने (सोयरिक)
३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

• उत्कृष्ट गीते :
१. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे – यल्गार होऊ दे)
२. अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)
३. प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे)

• उत्कृष्ट संगीत :
१. हितेश मोडक (हर हर महादेव)
२. निहार शेंबेकर (समायरा)
३. विजय गवंडे (सोंग्या)

• उत्कृष्ट पार्श्वसंगीत :
१. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. हनी सातमकर (आतुर)
३. सौमिल सिध्दार्थ (सनी)

• उत्कृष्ट पार्श्वगायक :
१. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत – भेटला विठ्ठल माझा)
२. पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत – का रे जीव जळला)
३. अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत – घे तुझ्यात सावलीत)

• उत्कृष्ट पार्श्वगायिका :
१. जुईली जोगळेकर (समायारा/गीत – सुंदर ते ध्यान)
२. आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत – बाई ग कस करमत नाही)
३. अमिता घुगरी (सोयरिक/गीत – तुला काय सांगु कैना)

• उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :
१. राहूल ठोंबरे-संजीव होवाळदार (टाईमपास 3 / गीत – कोल्ड्रीक वाटते गार, वाघाची डरकाळी )
२. उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत- आई जगदंबे)
३. श्री. सुजीत कुमार (सनी/ गीत – मी नाचणार भाई)

• उत्कृष्ट अभिनेता :
१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)
३. ललीत प्रभाकर (सनी)

• उत्कष्ट अभिनेत्री :
१. सई ताम्हाणकर (पॉन्डीचेरी)
२. अमृता खानविलकर(चंद्रमुखी)
३. सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)

• उत्कृष्ट विनोदी अभिनेता :
१. मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)
२. संजय नार्वेकर (टाईमपास)
३. भरत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)

• सहाय्यक अभिनेता :
१. योगेश सोमण (अनन्या)
२. किशोर कदम (टेरीटरी)
३. सुबोध भावे (हर हर महादेव)

• सहाय्यक अभिनेत्री:
१. स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२. क्षिती जोग (सनी)
३. मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

• उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :
१. अकुंर राठी (समायरा)
२. रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)
३. जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)

• उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :
१. ऋता दुर्गुळे (अनन्या)
२. सायली बांदकर (गाभ)
३. मानसी भवालकर (सोयरिक)

• प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती :
१. आतुर
२. गुल्हर
३. ह्या गोष्टीला नावच नाही

• प्रथम पदार्पण दिग्दर्शन :
१. 4 ब्लाइंड मेन
२. गाभ
३. अनन्या

Admin

Recent Posts

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…

50 minutes ago

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

4 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

5 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

23 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

24 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago