“मैदानाबाहेरील सेंच्युरी! अर्जुन-सानियाची ‘लाइफ पार्टनरशिप’ हिट”

News Sports

इंडियन क्रिकेटमध्ये आजकाल फक्त मैदानावरील शॉट्स नाही, तर मैदानाबाहेरील एका “लव्ह स्टोरी”ची पण जोरदार चर्चा आहे. हो, आपण बोलतोय क्रिकेटच्या देवाचा वारसदार अर्जुन तेंडुलकर आणि त्याच्या रिअल-लाइफ ‘पार्टनरशिप’बद्दल!

वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्टला, मुंबईतल्या हाय-प्रोफाईल वातावरणात, उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकसोबत अर्जुनचा साखरपुडा झाला. सोहळा अगदी फिल्मी स्टाईलमध्ये, पण मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला… आणि त्यानंतर सोशल मीडियावर फक्त ह्याच कपलची चर्चा!

सानिया चंडोक ही घई कुटुंबातील असून, रवी घई हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीचे मालक आहेत. सानियाने कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवली (2020). शिक्षणानंतर ती भारतात परतली आणि प्राण्यांवरील प्रेमामुळे तिने Mr. Paws Pet Spa & Store LLP सुरू केले. हे स्पा सेंटर श्वान, मांजर आणि पाळीव प्राण्यांच्या ग्रुमिंग व कोरियन-जपानी थेरेपी मसाजसाठी प्रसिद्ध असून, त्याची वार्षिक कमाई सुमारे 90 लाख रुपये आहे.

अर्जुन आणि सानियाची ओळख जुनीच आहे. दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखतात, तसेच सानिया आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर या चांगल्या मैत्रिणी आहेत. सारानेच अर्जुन आणि सानियाची पहिली भेट घडवून आणली. ही ओळख मैत्रीत, आणि नंतर प्रेमात बदलली. अखेर या प्रेमकथेचा साखरपुडा झाला असून, लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, लवकरच हा सेलिब्रिटी जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे.

Leave a Reply