Ganesh Visarjan 2025: दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवही उत्साहात संपन्न झाला. आता वेळ आली आहे ती आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची. दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या शुभ तिथीवर १०/११ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते.
अनंत चतुर्दशी तिथी
चतुर्दशी तिथी सुरुवात: ६ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ०३ वाजून १२ मिनिटांपासून
चतुर्दशी तिथी समाप्त: ७ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून १२ मिनिटांपर्यंत
अनंत चतुर्दशीला या शुभ मुहूर्तावर करा गणपती विसर्जन
प्रातः मुहूर्त (शुभ): सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांपासून ते सकाळी ०९ वाजून १० मिनिटांपर्यंत
अपराह्य मुहूर्त (चर, लाभ, अमृत): दुपारी १२ वाजून १९ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ०२ मिनिटांपर्यंत
सायाह्य मुहूर्त (लाभ): संध्याकाळी ६ वाजून ३२ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ०२ मिनिटांपर्यंत
रात्री मुहूर्त (शुभ, अमृत, चर): रात्री ९ वाजून २८ मिनिटांपासून ते मध्यरात्री १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत
उष:काल मुहूर्त (लाभ): ७ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांपासून ते सकाळी ६ वाजून ०२ मिनिटांपर्यंत
गणपती विसर्जन विधी
शुभ मुहूर्तावर गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करावे.
विसर्जनाच्या आधी बाप्पाला दूर्वा, फुलं, मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. बाप्पासाठी दही, भात आणि पोह्याची शिदोरी बांधून द्यावी.
बाप्पाच्या मंत्रांचा जप करावा, “ॐ गं गणपतये नमः” या स्तोत्राचे पठण करावे.
बाप्पाची आरती करून, बाप्पाच्या पूजेसाठी वापरली जाणारी सामग्री पाण्यात प्रवाहित करा.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणून बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करा.
मूर्तीचे योग्य वेळी दिवशी विसर्जन करणे आवश्यक असते. तसेच कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडू नये याची काळजी घ्यावी.
