“महाकाली” मध्ये अक्षय खन्नाचा गूढ अवतार; First Look पाहून व्हाल थक्क!

News

छावा चित्रपटातील औरंगजेबाच्या दमदार भूमिकेनंतर अक्षय खन्ना लवकरच नव्या रूपात दिसणार आहे. RKD Studios आणि दिग्दर्शक प्रशांथ वर्मा यांनी दुर्गा पुजेच्या निमित्ताने “महाकाली” चित्रपटातील अक्षय खन्नाचा नवा लूक जाहीर केला आहे.

“महाकाली” चित्रपटात अक्षय असुरांचे गुरू म्हणून ओळख असलेले शुक्राचार्य साकारणार आहे. याचा फर्स्ट लूक दिग्दर्शकांनी जगासमोर आणला आहे. या पोस्टरमध्ये अक्षयचे वेगळेच रूप दिसत आहे. लांबसडक रूपेरी दाढी, पांढरे वस्त्र आणि भेदक तेजस्वी नजर. या पोस्टरमध्ये शुक्राचार्यांच्या गूढ आणि प्रभावी व्यक्तिमत्वाची झलक दाखविणारा आहे.

आर के डी स्टुडिओने पोस्टर शेअर करत, “In the Shadows of gods, rose the brightest flame of rebellion… प्रस्तुत आहे #AkshayeKhanna शाश्वत असुरगुरू शुक्राचार्य यांच्या रूपात” असे लिहिले आहे. यामध्ये शुक्राचार्यांचे अजेय तेजस्वी रूप दर्शवले आहे.

चित्रपटामधील अक्षयचे पात्र सनातन विद्येचे अधिपती आणि मृत- संजीवनी मंत्राचे रक्षक म्हणून दाखवले गेले आहेत. ही भूमिका एका अध्यात्मिक मार्गदर्शक आणि अजिंक्य रणनीतीकार या दोन्ही रूपांचे दर्शन घडवणारे आहे.

यापूर्वी लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित “छावा” या चित्रपटात अक्षयने औरंगजेब ही भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत होता.

Leave a Reply