France Protest : सध्या संपूर्ण जगामध्ये एकच चर्चेचा मुद्दा आहे तो म्हणजे नेपाळमध्ये सुरु असणारा हिंसाचार. नेपाळमधील Gen Z तरुणांचं आंदोलन संपूर्ण देशभर पसरल्यानंतर शेवटी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा देत देश सोडला. तरीही नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून तणावाची परिस्थिती आहे. आता नेपाळनंतर फ्रान्समध्येदेखील मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला असल्याची माहिती समोर येत आहे.
नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही लोक रस्त्यावर उतरले आहेत. लोकांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात ब्लॉक एव्हरीथिंग नावाच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज आंदोलकांनी देशातील विविध महामार्ग रोखले. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, तसेच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सध्या सर्वत्र गोंधळ सुरु आहे. आंदोलकांनी काही बसेसनाही आग लावली असल्याचे समोर आले आहे.
आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आली आहे. मात्र तरीही पॅरिससह अनेक मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. फ्रान्समध्ये सध्या राजकीय गोंधळ सुरु आहे. संसदेत अलीकडेच पंतप्रधान फ्रँकोइस बायरो यांच्याविरोधात विश्वासदर्शक ठराव आणला होता, यात त्यांनी बहुमत सिद्ध करण्यात त्यांना आपयश आले आहे. त्यानंतर आता तीव्र आंदोलन सुरु झाले आहे, त्यामुळे देशात गोंधळ उडाला आहे.
ब्लॉक एव्हरीथिंग म्हणजे काय?
ब्लॉक एव्हरीथिंग हे फ्रान्समधील आंदोलनाचे नाव आहे. यामागचा उद्देश असा आहे की, देशाची सध्याची राजकीय व्यवस्था आता जनतेसाठी उपयुक्त नाही. ही व्यवस्था उजव्या विचारसरणीच्या लोकांनी सुरू केली होती, मात्र आता ती डाव्या आणि अति-डाव्या विचारसरणीच्या लोकांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांचे म्हणणे आहे की, जर व्यवस्था काम करत नसेल तर देशातील यंत्रणा बंद करा. त्यामुळे आंदोलकांनी महामार्ग, शहरे आणि वाहतूक व्यवस्था बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे याला ब्लॉक एव्हरीथिंग असे म्हटले जात आहे.
देशातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने 80 हजार सैनिक तैनात केले आहेत. यातील 6000 सैनिक पॅरिसमध्ये असणार आहेत. फ्रेंच माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार सुमारे 1 लाख लोक या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल ८०,००० पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आतापर्यंत २०० हून अधिक जणांना जणांना अटक करण्यात आलं आहे. हजारो लोक रस्त्यावर उतरले असून सरकारच्या आर्थिक धोरणांविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत. आंदोलक आणि पोलिसांमध्येही संघर्ष पाहायला मिळत आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
२० महिन्यांत फ्रान्समधील सरकार चौथ्यांदा कोसळलं
फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरतेचं सावट अधिकच गडद झाल्याचं दिसून आलं. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी स्थापन झालेलं पंतप्रधान फ्रांस्वा बायरो यांचं सरकार सोमवारी कोसळलं. विशेष बाब म्हणजे गेल्या २० महिन्यांत चार वेगवेगळ्या नेत्यांनी फ्रान्सच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. आता पाचव्यांदा तिथे नवीन पंतप्रधानांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरतेचं सावट अधिकच गडद झाल्याचं दिसून आलं. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी स्थापन झालेलं पंतप्रधान फ्रांस्वा बायरो यांचं सरकार सोमवारी कोसळलं. विशेष बाब म्हणजे गेल्या २० महिन्यांत चार वेगवेगळ्या नेत्यांनी फ्रान्सच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. आता पाचव्यांदा तिथे नवीन पंतप्रधानांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
