News

Operation Sindoor: ऑपरेशन तळ लवकरच उभारतोय;दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याची कबुली

After JeM Lashkar commander big admission on Operation Sindoor : भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहमदच्या कमांडरचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामधून बहावलपूर कॅम्पशी मसूद अजहरचा संबंध नसल्याचा पाकिस्तानाचा दावा उघडा पडला होता. याच्या काही दिवसांनंतरच लष्कर-ए-तोयबाच्या एका ऑपरेटीव्हने मान्य केले आहे की, मुरिदके येथील मरकझ तैयबा येथील दहशतवादी गटाचे मुख्यालय ऑपरेशन सिंदूर दरम्यान उद्ध्वस्त केले होते.

Navaratri 2025: म्हणून करावा नवरात्रीचा उपवास ! सुखसमृध्दीसाठी हे नियम नक्की पाळा…

Narendra Modi : नरेंद्र मोदीच नसते तर….

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर कासिमचा व्हिडीओ असून तो व्हिडीओमध्ये ७ मे रोजी उद्ध्वस्त करण्यात आलेला मुरिदके येथील दहशतवादी तळ पुन्हा बांधण्याचे काम सुरू असल्याचे सांगताना दिसत आहे.

इतकेच नाही तर हा तळ पूर्वीपेक्षा मोठा बांधला जात असल्याचेही त्याने मान्य केले. मुरिदके हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखूपुरा जिल्ह्यातील एक शहर आहे.

Rahul Gandhi PC: VoteChoriचा पुन्हा तगादा! राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
“सध्या मुरिदके येथे हल्ल्यात (भारताच्या) उद्ध्वस्त झालेल्या मरकझ तैयबा येथे पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. अल्लाच्या कृपेने ही मशिद पूर्वीपेक्षा मोठी बांधली जाईल,” असे कासिम व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे. तो एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

भारतीय लष्कराने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईमध्ये ९ दहशतवादी तळ उद्भ्वस्त करण्यात आले होते, ज्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा मुरिदके येथील दहशतवादी तळ देखील होता. ही कारवाई जम्मू-काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आली होती.

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

3 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

4 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

22 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

23 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago