News

Achyut Potdar Death News : ‘कहना क्या चाहते हो’ प्राध्यापकाची अचानक एक्झिट

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक परिचित चेहरा, सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘कहना क्या चाहते हो’ डायलॉग फेमस करणारे अच्युत पोतदार यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी ठाण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘३ इडियट्स’ या चित्रपटातला त्यांचा कहना क्या चाहते हो? हा संवाद आजही लोक meme म्हणून वापरतात. छोट्या भूमिकांतूनही लक्ष वेधून घेणारे आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला आत्मीयतेने साकारणारे म्हणून अच्युत पोतदार यांची ओळख होती.

२२ ऑगस्ट १९३४ रोजी जबलपूर येथे जन्मलेले अच्युत पोतदार यांनी अर्थशास्त्रात एमए करून त्याचे गोल्डमेडलही मिळवलेले होते. त्यांनी काही काळ मध्य प्रदेशातील रीवा येथे प्राध्यापक म्हणूनही काम केलेले.

Journey of Lux soap :कपडे धुण्याचा साबण ‘लक्स’ कसा झाला ?

त्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून सेवा दिलेली. १९६७ मध्ये त्यांनी सेनेतून निवृत्ती घेतली आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी सुरू केली. तब्बल २५ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी १९९२ मध्ये निवृत्ती घेतली.

सेना, शैक्षणिक क्षेत्र आणि कॉर्पोरेट जगतातील यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी पूर्णवेळ अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले. वयाच्या ४४ व्या वर्षी सुरू झालेला हा प्रवास, पुढील चार दशकांत त्यांना प्रत्येक घराघरात ओळख मिळवून देणारा ठरला.

अच्युत पोतदार यांनी आपल्या कारकीर्दीत १२५ पेक्षा अधिक चित्रपट,५० हून अधिक टीव्ही मालिका, २६ नाटकं आणि ४५ जाहिरातींमध्ये काम केले. त्यांनी साकारलेल्या भूमिका कधी गंभीर, कधी हलक्या-फुलक्या तर कधी हृदयस्पर्शी अशा सर्वच प्रकारच्या होत्या.

वोट चोरीचा खरा इतिहास! १९४७ पासून गांधी घराण्याचे गुपित उघड

त्यांचे प्रसिद्ध चित्रपट म्हणजे तेजाब, परिंदा, अर्धसत्य, राजू बन गया जेंटलमन, ये दिल्लगी, हम साथ साथ हैं, वास्तव, परिणीता, लगें रहो मुन्ना भाई, दबंग २, व्हेंटिलेटर अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.

टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी भारत एक खोज, वागळे की दुनिया, माझा होशील ना अशा मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांचा डायलॉग म्हटला तरी लोकांना त्यांचा चेहरा आठवत असे, एवढे ते प्रसिद्ध झाले होते.

अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी प्रभावी काम केले असले तरी ३ इडियट्समधील त्यांची प्राध्यापकाची भूमिका लोकांच्या आजही लक्षात आहे. कहना क्या चाहते हो? हा साधा प्रश्न इतका लोकप्रिय झाला की आजही तो डायलॉग मीम्स, सोशल मीडियावरील जोक्स आणि पॉप-कल्चरचा भाग बनला आहे.

त्यांनी स्वतःला कधीच नायक म्हणून मांडले नाही, परंतु प्रत्येक छोट्या भूमिकेतूनही मोठा ठसा उमटवला. डॉक्टर, वडील, जज, प्राध्यापक अशा भूमिका त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे जिवंत वाटत.

अच्युत पोतदार यांच्यासारख्या ज्येष्ठ अनुभवी, प्रगल्भ आणि संवेदनशील कलाकार गमावल्याची भावना प्रेक्षकांच्या मनात आहे. परंतु, ते त्यांच्या डायलॉग्ज आणि भूमिकांमुळे प्रेक्षकांमध्ये कायम जिवंत राहतील यात शंका नाही

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

3 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

4 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

22 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

22 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago