जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी निधन झाले. दिल्लीतील राम मनोहर रूग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदिर्घ काळापासून सुरू असलेल्या किडनीच्या विकारांमुळे ते त्रस्त होते. प्रकृती अधिक बिघडल्याने 11 मे रोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे सत्यपाल मलिक चर्चेत आले होते. या प्रकरणी त्यांनी भाजप सरकारवर टीका केली होती. गेले अनेक वर्षे ते राज्यपाल म्हणून कार्यरत होते. जम्मू-काश्मीर आधी गोवा आणि मेघालय येथे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले होते.