31st TMC Varsha Marathon 2025 : रोज तर धावताचं! एकदा मॅरेथॉनमध्ये धावा! ठाणे वर्षा मॅरेथॉनची नोंदणी सुरू

News

पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाणे महानगरपालिकेची प्रतिष्ठीत वर्षा मॅरेथॉन पुन्हा नव्या उर्जेसह दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

वर्षा मॅरेथॉन म्हणजे फक्त शर्यत नाही, तर ती ठाणेकरांचा उत्साह आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारी ठरणार आहे. मॅरेथॉन ठाण्याची, ऊर्जा तरूणाईची! या घोषवाक्यासह यंदाची मॅरेथॉन आरोग्यप्रेमी आणि तरूणाईच्या उर्जेला प्रेरणादायी ठरणार आहे.

वर्षा मॅरेथॉनमध्ये निसर्गाशी एकरूप होत, आरोग्य, जिद्द आणि उत्साह अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशावेळी तरूणांनी एकत्र येऊन धावणं ही सामाजिक एकतेची, आरोग्यविषयक जाणिवांची आणि ठाण्याच्या अभिमानाची ओळख ठरेल.

सहभागींसाठी खास सुविधा
या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम नियोजन करण्यात आले आहे.

  • टायमिंग चिपसह अधिकृत बिब क्रमांक (वेळ नोंदणीकृत गटासाठी) – जे सहभागी अधिकृत वेळसिद्ध शर्यतीत धावतात, त्यांच्याकरीता हि सुविधा महत्वाची ठरणार आहे.
  • फिनिशर पदक – मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर प्रत्येक धावपटूचा सन्मान म्हणून आकर्षक पदक देण्यात येणार आहे.
  • शर्यतीदरम्यान ठराविक अंतरावर हायड्रेशन आणि प्राथमिक उपचारासाठी केंद्रे उपलब्ध असतील.
  • ई-प्रमाणपत्र – स्पर्धेनंतर प्रत्येक धावपटूला डिजिटल स्वरूपात सहभाग घेतल्याचे ई-प्रमाणपत्र दिले जाईल.
  • नाश्ता व अल्पोपहार – स्पर्धेनंतर अल्पोपहाराची व्यवस्था

10 ऑगस्ट 2025 हा दिवस आपल्या दिनदर्शिकेत नक्की नोंद करून ठेवा आणि या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा! मॅरेथॉनचा आनंद घेण्यासाठी आजच https://bit.ly/40GQI1c लिंक वर क्लिक करून अधिकृत नोंदणी करा.

Leave a Reply