Maharashtra Local Body Election 2025: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीसाठी शनिवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शनिवारी अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बरेच नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजपच्या सर्वाधिक नगरसेवकांचा समावेश आहे. तब्बल १०० नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत भाजपने नगरसेवकांचे शतक पूर्ण केले. निवडणुकीआधीच भाजपच्या १०० नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामुळे हे नगरसेवक बिनविरोध निवडून आले असल्याचा दावा त्यांनी केला.
यामध्ये कोकणमधील ४, उत्तर महाराष्ट्रमधील ४९, पश्चिम महाराष्ट्रमधील ४१, मराठवाडामधील ३, विदर्भातील ३ नगरसेवकांचा यात समावेश आहे. निवडणुकीआधीच भाजपाने शंभरी गाठलेली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आपला जलवा असाच कायम ठेवणार का? हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
