China’s Skyscrapers: ‘लास्ट-माईल क्लायंबर्स’: चीनमध्ये जन्माला आलेली एक नवी नोकरी

China’s Skyscrapers

चीनमधील उंच इमारती इतक्या उंच आहेत की त्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर जेवण पोहोचवण्यासाठी एक नवीन काम निर्माण झाले आहे, ज्याला “व्हर्टिकल डिलिव्हरी” किंवा “लास्ट माईल क्लाइंबर्स” म्हणतात. शेंझेनसारख्या महानगरांमध्ये फूड डिलिव्हरी करणारे डिल्हीवरी बॉय्झ इमारतीच्या आतल्या मजल्यावर पोहोचायला खूप वेळ घेतात आणि त्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च वाढतो. त्यामुळे ते खालच्या मजल्यावर जेवण उतरवतात आणि नंतर तेच जेवण इमारतीच्या उच्च मजल्यावर पोहोचवण्याचं काम वेगळ्या लोकांकडे दिलं जातं.या समस्येवर तोडगा म्हणून एका अनौपचारिक कामगार वर्गाचा उदय झाला आहे: ‘लास्ट-माईल क्लायंबर्स’ किंवा ‘व्हर्टिकल कुरिअर्स

या कामाला एक प्रकारची अर्ध-औपचारिक अर्थव्यवस्था म्हणता येते जिथे विद्यार्थी, निवृत्त लोक किंवा स्थानिक रोजगार शोधणारे लोक इमारतीच्या उंच मजल्यावर जेवण पोहोचण्याचं काम करतात. त्यांना “डिलिव्हरी-फॉर-डिलिव्हरी वर्कर्स” म्हटलं जातं, आणि हे लोक प्रत्येक ऑर्डरसाठी काही शेकडो रुपयांची कमाई करतात. मात्र, हे काम फारच कष्टाचं, स्पर्धात्मक आणि कधी कधी धोकादायकही असतं, कारण हे काम पूर्णपणे अनौपचारिक आहे, कुठलेही करार न करता, बिनधास्तपणे करतात.

बाहेरच्या रस्त्यावरून पत्त्यापर्यंत माल पोहोचवणं सोपं आहे, पण खरी कसोटी इमारतीच्या आत सुरू होते. या प्रचंड मोठ्या इमारतींमध्ये प्रवेश करून, गर्दीच्या लिफ्ट्समधून वरच्या मजल्यांवर पोहोचायला कधीकधी 30 ते 40 मिनिटे लागतात. डिलिव्हरी कंपन्यांनी रायडर्सना दिलेला वेळेचा कोटा पूर्ण करणं या ‘व्हर्टिकल स्ट्रगल’मुळे अशक्य झालं आहे.

चीनच्या या नव्या कामाच्या कहाणीमुळे आधुनिक शहरीकरणातील एक गंभीर समस्या देखील उघडकीस येते जिथे शहरे आकाशाला भिडणाऱ्या इमारती बांधून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या घेवून चालवली जात आहेत, तिथे त्या लोकांच्या दैनंदिन गरजा आणि सेवा यांचा विचार उचित पद्धतीने होत नाही. म्हणून मानवी मेहनतीवर आधारित अशा अर्ध-औपचारिक कामाची गरज निर्माण झाली आहे.

हा युगातील दृश्य स्पष्ट करतं की, प्रगतीशी जोडलेले हे आर्थिक तंत्रज्ञान कधी कधी छोटीमानवी कामगारांची मेहनत आणि त्याग यावर आधारित असते,मोठमोठ्या इमारतींच्या काचेच्या भिंतींमध्ये जेव्हा आपण चीनच्या आर्थिक प्रगतीचं चित्र पाहतो, तेव्हा या इमारतींच्या खाली आणि आत दडलेल्या श्रमाकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. ‘लास्ट-माईल क्लायंबर्स’ची कथा केवळ एका डिलिव्हरी समस्येवरचा तात्पुरता उपाय नाही, तर शहरी जीवनातील एका व्यापक वास्तव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *