Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून संपवलं. अशीच एक घटना आता अहमदाबादमधूनही समोर आली आहे. रुबी नावाच्या महिलेने तिच्या प्रियकरासह संगनमत करुन पतीला ठार केलं. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन स्वयंपाक घरात पुरला होता. ही धक्कादायक घटना पोलिसांनी समोर आणली. १४ महिन्यांनी ही घटना उघडकीस आली आहे. दृश्यम सिनेमा प्रमाणेच ही घटना घडली आहे.
Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?
JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर
नेमकी काय घटना घडली आहे?
अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार समीर अन्सारी नावाचा एक माणूस मागच्या वर्षभरापासून गायब होता. त्याचा शोध पोलीस घेत होते पण त्याचा छडा लागत नव्हता. त्याचं काहीतरी बरंवाईट झालं असेल असा संशय पोलिसांना येत होता. पण कुठलाही तपशील किंवा पैलू त्यांच्या हाती लागत नव्हता. १४ महिने उलटले तरीही समीरचा काही शोध लागला नाही. पोलिसांना तपासात ही बाब समोर आली की समीरचा मोबाइलही १४ महिन्यांपासून बंद आहे. तसंच तो १४ महिन्यांपासून कुणाच्याही संपर्कात नाही. त्यामुळे पोलिसांना काहीतरी घातापात झाला असावा हा संशय आला आणि त्यांनी त्या अनुषंगाने चौकशी आणि तपास सुरु केला.
रुबीच्या सांगण्यावरुन मी आणि इतर चार जणांनी समीरचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याच्यावर वार केले आणि त्याची हत्या केली. तसंच समीरच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर स्वयंपाक घर खोदलं. त्यात हे तुकडे पुरले आणि वरुन सिमेंट लावलं तसंच टाइल्सही लावून टाकल्या. पोलिसांनी यानंतर रुबी आणि समीरच्या घरात मॅजिस्ट्रेटसह आरोपीला नेलं. तिथे खोदकाम केलं. त्यावेळी मानवी अवशेष मिळाले. पोलिसांनी हाडं आणि सापळ्याचे अवशेष फॉरेन्सिकसाठी पाठवले आहेत. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रुबी आणि समीर पाच वर्षांपासून याच भागात राहात होते. मात्र रुबी आणि इमरान यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यावरुन समीर आणि रुबी यांचे वाद होत होते, खटके उडत होते. वर्षभरापूर्वी इमरानही याच भागात राहण्यासाठी आला होता. त्यानंतर काही दिवसांनी रुबीने शेजाऱ्यांना सांगितलं की समीर कामानिमित्त दुबईला निघून गेला आहे. पण प्रत्यक्षात रुबीने समीरची इमरानच्या मदतीने समीरची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घराच्या स्वयंपाक घरात पुरला होता. समीरचं हे घर रुबीने भाडे तत्त्वावर दिलं होतं आणि ती इमरानसह राहू लागली होती. भाडेकरुंनी सांगितलं की आम्ही या घरात आलो तेव्हा आम्हाला इथे विचित्र दर्प येत. काहींना काही भास होत. त्यामुळे त्यांनी चौकशी केली आणि हळूहळू हे प्रकरण उघडकीस येऊ लागलं. त्यानंतर पोलिसांनी इमरानला ताब्यात घेतलं आणि सगळी चौकशी केली त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
