फॉरेन्सिक सायन्सच्या शिक्षणाचा वापर करत केला बॉयफ्रेंडचा खून; पुरावे लपवण्यासाठी घडवला स्फोट

News Trending

उत्तर दिल्लीच्या तिमारपूर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या 32 वर्षीय रामकेश मीणाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या हत्येमधील 21 वर्षीय अमृता चौहान हीला मुख्य सुत्रधार मानले जात आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, अमृचा ही बी.एससी. फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी आहे. अमृताने आपल्या एक्स बॉफ्रेंड सुमित कश्यप आणि त्याचा मित्र संदीप कुमार यांच्या मदतीने रामकेशचा खून केला असल्याचे सांगितले जात आहे. तिघां आरोपींनी मिळून रामकेशचा गळा दाबून खून केला आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी खोलीत तूप, तेल आणि वाइन ओतून आग लावली.

6 ऑक्टोबरला तिमारपूरमधील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून जळालेला मृतदेह आढळला. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय घेतला गेला, मात्र फॉरेन्सिक तपासणीत गुन्ह्याचा धक्कादायक सत्य बाहेर आले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुखवटा घातलेले दोन पुरुष आणि त्यानंतर एक तरुणी बाहेर जाताना दिसल्याने पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. तपासादरम्यान पोलिसांनी अमृताचा मोबाईल लोकेशन घटनास्थळी असल्याचे आढळले आणि तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत अमृताने कबुली देत सांगितले की, मे 2025 पासून तिचे आणि रामकेशचे संमतीने संबंध होते. रामकेशकडे तिचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ होते. हे डिलीट करण्यास त्याने नकार दिला. यानंतर अमृताने घडलेला प्रकार तिचा एक्स बॉयफ्रेंड सुमित कश्यपला सांगितला. सुमितने त्याच्या मित्राकडे मदत मागितली. या तिघांनी रामकेशचा कट रचला आणि 5 ऑक्टोबरच्या रात्री रामकेशचा गळा दाबून खून केला. यानंतर खोलीत तूप, तेल आणि वाइन ओतून आग लावली. सिलेंडर उघडे ठेवून स्फोट झाल्याचे दर्शवले. ज्याने करून स्फोटामुळे रामकेशचा मृत्यू झाल्याचे भासवता येईल.

मात्र रामकेशच्या कुटुंबीयांना मृत्यू संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना कॉल रेकॉर्ड तपासण्यास सांगितले. यामुळे घटनेच्या रात्री अमृताचे लोकेशन त्याच परिसरात असल्याचे दिसले. पोलिसांनी आरोपींकडून हार्ड डिस्क, ट्रॉली बॅग, मृतकाचा शर्ट तसेच दोन मोबाईल फोन जप्त केले असून तिन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यामागे आणखी कोणी सहभागी होते का याचा शोध सुरू आहे.

Leave a Reply